agriculture news in marathi, sonapur grampanchayat became paper less, Maharashtra | Agrowon

सोनापूर ग्रामपंचायत झाली पेपरलेस
संदीप रायपुरे
रविवार, 2 सप्टेंबर 2018

गोंडपिपरी : डिजिटल तंत्रज्ञानामुळे आता प्रशासकीय कारभार पेपरलेस करण्यावर शासनाचा भर आहे. परंतु अद्ययावत सुविधा देऊनही याचा उपयोग फार कमी ग्रामपंचायतीमध्ये होताना दिसतो. मात्र, राज्याच्या सीमेवर असलेल्या सोनापूर (देशपांडे) ग्रामपंचायतीने दैनंदिन कामकाजामध्ये  ‘ई-ग्रामसॉफ्ट` प्रणालीचा प्रभावीपणे वापर करीत जिल्ह्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मान पटकविला.

गोंडपिपरी : डिजिटल तंत्रज्ञानामुळे आता प्रशासकीय कारभार पेपरलेस करण्यावर शासनाचा भर आहे. परंतु अद्ययावत सुविधा देऊनही याचा उपयोग फार कमी ग्रामपंचायतीमध्ये होताना दिसतो. मात्र, राज्याच्या सीमेवर असलेल्या सोनापूर (देशपांडे) ग्रामपंचायतीने दैनंदिन कामकाजामध्ये  ‘ई-ग्रामसॉफ्ट` प्रणालीचा प्रभावीपणे वापर करीत जिल्ह्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मान पटकविला.

    महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर (देशपांडे) ही ग्रामपंचायत  गावाच्या विकासासाठी नेहमी प्रयोगशील उपक्रम राबविते.  ग्रामपंचायतीने आपले सरकार योजनेतील ‘ई-ग्रामसॉफ्ट`  संगणक प्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्यास सुरवात केली आहे. या माध्यमातून गावकऱ्यांना ३३ प्रकारचे विविध दाखले ग्रामपंचायतीमधून अॉनलाइन मिळतात. आर्थिक व्यवहार, तसेच विविध प्रकारच्या नोंदी संगणकावर  करण्यास सुरवात झाली आहे.

  ‘ई-ग्रामसॉफ्ट` प्रणालीतून ग्रामपंचायतींचा कारभार पेपरलेस करण्याची संकल्पना ग्रामविकास विभागाने मांडली. या माध्यमातून ग्रामपंचायतीतर्फे देण्यात येणाऱ्या सर्व माहितीचे संकलन या प्रणालीत होते. यानंतर  प्रणालीच्या माध्यमातून ग्रामस्थांना विविध दाखले मिळण्याची सुविधा आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना ‘ई-ग्रामसॉफ्ट` प्रणालीचा वापर करणे आवश्यक आहे.  

सोनापूर (देशपांडे) गावच्या सरपंच जया सातपुते, ग्रामसेवक आशिष आकनूरवार यांनी  या प्रणालीच्या वापरासाठी पुढाकार घेत प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात केली.  या प्रणालीमुळे ग्रामपंचायतीतून नागरिकांना विविध प्रकारचे १ ते ३३ दाखले अॉनलाइन मिळू लागले आहेत.  ई-ग्रामसाॅफ्ट प्रणालीचा प्रभावीपणे वापर करून सोनापूर (देशपांडे) या ग्रामपंचायतीने जिल्ह्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मान पटकविला. आता सोनापूर (देशपांडे) ग्रामपंचायतीत आता हस्तलि.िखत नोंदी बंद झाल्या असून, संपूर्ण कारभार आॅनलाइन झाला आहे.

पंचायत समितीचे सभापती दीपक सातपुते, संवर्ग विकास अधिकारी शेषराव बुलकुंडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, विस्तार अधिकारी श्री. देवतळे, श्री. सावसागळे यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक चालक सचिन पाल, तालुका समन्वयक अमोल वानखेडे यांच्या मदतीने सरपंच जया सातपुते, ग्रामसेवक आशिष आकनुरवार यांनी सोनापूर (देशपांडे) ग्रामपंचायतीला हा मान मिळवून दिला आहे.

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...