पाने खाणाऱ्या अळीमुळे ज्वारीचे नुकसान

अनेक शेतकरी पशुधनासाठी ज्वारीची पेरणी करतात. मात्र यंदा पाने खाणाऱ्या अळ्या लवकर आल्या असून, त्या कोवळे पीक फस्त करीत आहेत. - नामदेव पाटील, शेतकरी, कंडारी.
पाने खाणाऱ्या अळीमुळे ज्वारीचे नुकसान
पाने खाणाऱ्या अळीमुळे ज्वारीचे नुकसान

जळगाव : जिल्ह्यात ज्वारीची उगवण बऱ्यापैकी झाली आहे, परंतु कमी पाऊस व इतर कारणांमुळे किडींचा प्रकोप वाढला आहे. नियंत्रणासाठी उपाययोजना वा फवारण्या कराव्या लागत असून, त्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे.

ज्वारीची पेरणी यंदा सुमारे २५ हजार हेक्‍टरवर आहे. अमळनेर, पारोळा, रावेर, यावल, पाचोरा, भडगाव, जामनेर या भागात पेरणी अधिक आहे. जूनच्या मध्यातच पेरण्या अनेक ठिकाणी झाल्या, परंतु नंतर अपेक्षित पाऊस आला नाही. त्यातच काही ठिकाणी खोडकीड असल्याचे तज्ज्ञ व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्या पीक खोडापासून नष्ट करीत असल्याने पिकात तूट येत आहे. एका ओळीत २० ते २५ टक्के नुकसान खोडकीड करीत आहे. याबरोबरच पाने खाणाऱ्या अळ्या पानांवर हल्ला करून नुकसान करीत आहेत. हलक्‍या, पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्रात आणि शेणखत चांगल्या प्रमाणात टाकलेल्या क्षेत्रात या किडी अधिक येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

एका ओळीत अधिकचे नुकसान झाल्याने तूट मोठी असणार आहे. परिणामी काही ठिकाणी फेरपेरणी करावी लागण्यासारखी स्थिती आहे. जमिनीतील ओलावा लक्षात घेता नव्याने पेरणी काही शेतकऱ्यांनी केली आहे. एक एकरात फवारणीसाठी कीटकनाशक, मजुरी खर्च आदी अडचणींनाही शेतकऱ्यांसमोर आहेत. फेरपेरणीसाठी बियाण्यांवरचा अतिरिक्त खर्चही सोसायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com