agriculture news in marathi sorghum sowing status, jalgon, maharshtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली
चंद्रकांत जाधव
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017
दादरची पेरणी यंदा वाढू शकते. कारण परतीचा पाऊस काहीसा लाभदायी ठरेल. दिवाळीनंतर पेरणीला आणखी वेग येईल. 
- किशोर चौधरी, शेतकरी, आसोदे, जि. जळगाव.
जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे हरभऱ्यासह दादरच्या (रब्बी ज्वारी) पेरणी वेग घेतला आहे. त्यातच १०- १२ दिवसांपूर्वी पेरणी केलेली दादर तरारली असून, आता वातावरणात गारवा निर्माण होत असल्याने दादरसाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. 
 
दिवाळीनंतर थंडीचे आगमन होते, असे मानले जाते. अर्थातच दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीनंतर तीन - चार दिवसांत दादरची पेरणी आटोपून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. खानदेशात यंदा दादरचे अपेक्षित क्षेत्र ६३ हजार हेक्‍टर एवढे आहे. त्यात एकट्या जळगाव जिल्ह्यात जवळपास ३६ हजार हेक्‍टरवर दादरची पेरणी होण्याची शक्‍यता आहे. 
 
यापाठोपाठ धुळे व नंदुरबारात पेरणी होईल. दादरची पेरणी विशेषतः तापीकाठ व गिरणा काठालगतच्या गावांमध्ये परंपरेनुसार होते. त्यात शिंदखेडा, अमळनेर, जळगाव, यावल, चोपडा, शिरपूर, शहादा, नंदुरबार या तालुक्‍यांमधील तापीकाठावर पेरणी अधिक केली जाते. सर्वाधिक पेरणी चोपडा, शिरपूर, जळगाव तालुक्‍यात केली जाते. उडीद, मूग व सोयाबीनच्या रिकाम्या क्षेत्रावर दादर पेरणी अधिक केली जात आहे. 
 
दादरची यंदा अपेक्षित क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज आहे. कारण परतीचा पाऊस झाल्याने पेरणीसाठी हवा तसा वाफसा सध्या आहे. तसेच वातावरणातही गारवा आहे. सकाळी दवबिंदू दिसू लागले आहेत. दिवाळीनंतर उर्वरित क्षेत्रात पेरणीला वेग येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पेरणीसाठी अनेक शेतकरी यंदा ट्रॅक्‍टरचा उपयोग करीत आहेत. जमिनी कडक झाल्याने ट्रॅक्‍टरचा उपयोग सुरू असल्याचे सांगण्यात येते. 

इतर अॅग्रो विशेष
तेल्हारा तालुक्यात बीटीवर बोंड अळीअकोला ः यंदाच्या हंगामात प्री-मॉन्सून लागवड...
साखरेसाठी दुहेरी दर योजना अव्यवहार्यनवी दिल्ली ः साखरेचे दर घसरल्याने उद्योगात वापर...
आता होणार पीक पेऱ्याची अचूक नोंद लातूर  : पेरणीचे सूक्ष्म नियोजन व अचूक संकलन...
पावसाचा जोर वाढण्याचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे...
बनावट संवर्धके, कीटकनाशकांचा २९ लाखांचा...परभणी: विनापरवाना बनावट पीकवाढ संवर्धके (...
दूध दराबाबतचे हमीपत्र देणे बंधनकारकपुणे  ः दूधदरप्रश्‍नी शासनाने जाहीर केलेल्या...
पुणे दूध संघाला ‘एनडीडीबी’चे मानांकनपुणे ः भेसळयुक्त दूध विक्रीला आळा घालण्यासाठी...
पालख्या पंढरपूरच्या उंबरठ्यावर...भाग गेला, शीण गेला । अवघा झाला आनंद ।। ...
शेतीला दिली शेळीपालनाची जोडपाटबंधारे खात्यातील नोकरी सांभाळून राम चंदर...
बचत गटातून वाढली रोजगाराची संधीशेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील महिलांनी...
दूध दरवाढ निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत...कोल्हापूर: दूध संघांनी गायीच्या दुधास २५ रुपये...
विदर्भ, मराठवाडा विकासासाठी २२ हजार...नागपूर (विशेष प्रतिनिधी) ः विदर्भ, मराठवाडा आणि...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २०...
जमिनीच्या सुधारणेसह आले पिकाची...जमिनीची सुपीकता टिकवणे हे सर्वात महत्त्वाचे झाले...
रोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती...शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा...
कुटुंब एेवजी व्यक्ती घटक माणून कर्जमाफी...नागपूर : "शेतकरी सन्मान योजने" साठी आता कुटुंब...
सर्व इथेनॉल खरेदीची केंद्र शासनाची...नागपूर : अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला...
गनिमी काव्याने ‘जाम’पुणे: दूध उत्पादकांनी गनिमी कावा करत राज्यभरात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
`एफआरपी`चे कारखाने संघाकडून स्वागतपुणे : साखर कारखाने अडचणीत असतानाही एफआरपीमध्ये...