agriculture news in marathi, Sorted simens next generation | Agrowon

‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मार्च 2019

नगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूधउत्पादक संघ व बायफ मित्र (बीआयएसएलडी) यांच्यातर्फे ऑक्‍टोबर-२०१६पासून सॉर्टेड सिमेन प्रकल्प राबविण्यात येतो. संघाच्या कार्यक्षेत्रातील उंदीरवाडी येथील १८ महिन्यांच्या कालवडीवर सॉर्टेड सिमेनचे रेतन करण्यात आले. त्या कालवडीनेही पुन्हा सुदृढ कालवडीस जन्म दिला. त्यामुळे सॉर्टेड सिमेनचा हा प्रयोग यशस्वी झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दिली.

नगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूधउत्पादक संघ व बायफ मित्र (बीआयएसएलडी) यांच्यातर्फे ऑक्‍टोबर-२०१६पासून सॉर्टेड सिमेन प्रकल्प राबविण्यात येतो. संघाच्या कार्यक्षेत्रातील उंदीरवाडी येथील १८ महिन्यांच्या कालवडीवर सॉर्टेड सिमेनचे रेतन करण्यात आले. त्या कालवडीनेही पुन्हा सुदृढ कालवडीस जन्म दिला. त्यामुळे सॉर्टेड सिमेनचा हा प्रयोग यशस्वी झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दिली.

अमेरिका व युरोपियन देशात व्यावसायिक डेअरी फार्ममध्ये वापर होणाऱ्या आणि सुमारे ३० ते ३२ लिटर दूध देणाऱ्या गायींची पैदास करणाऱ्या सुधारित रेताचे (सॉर्टेड सिमेन) वितरण गोदावरी दूधउत्पादक संघ व बायफ यांच्या सहकार्यातून संघाच्या कार्यक्षेत्रात २० जानेवारी २०१६ पासून करण्यात येते. आडगाव चोथवा (येवला) येथील संकरित गो-पैदास केंद्रामार्फत उंदीरवाडी येथील शेतकरी भाऊसाहेब चव्हाण यांना एचएफ जातीच्या रेताचे वितरण केले होते. कृत्रिम रेतन केलेल्या त्यांच्या दीड वर्षाच्या कालवडीने १४ मार्च रोजी पुन्हा कालवडीस जन्म दिला. १८ महिन्यांची ही कालवड रोज २१ लिटर दूध देते. अनेक शेतकरी या प्रकल्पाकडे वळत असून, दूध उत्पादनवाढीसाठी याचा चांगला लाभ होणार आहे. 

संघाच्या कार्यक्षेत्रात आजपर्यंत ४०३ कालवडी जन्मास आल्या असून, २२ कालवडींना कृत्रिम रेतन करण्यात आले आहे. त्यापैकी १५ कालवडी गाभण आहेत, अशी माहिती बायफचे विभागीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जिगळेकर यांनी दिली. संघाचे अध्यक्ष परजणे, बायफचे मुख्य कार्यक्रम समन्वयक व्ही. बी. दयासा, कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत धंदर, बायफचे अधिकारी डॉ. शब्बीर शेख यांनी कालवडीची पाहणी केली.  
संपर्क : डॉ. जिग्लेकर ८७८८८६०९८१

इतर अॅग्रो विशेष
राजगुरुनगरचा आदर्शराजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाला...
पीक कर्जवाटपाचा मुहूर्त टळणार?या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आल्याने आणि मे...
फळबाग वाचविण्यासाठी सलाइनद्वारे पाणी जिंतूर, जि. परभणी : जिल्ह्यात उद्भवलेल्या...
सिन्नर तालुक्यात दुष्काळाने डाळिंब...नाशिक  : पाऊस कमी झाल्याने संपूर्ण सिन्नर...
विदर्भात उष्णतेची लाटपुणे ः मराठवाडा ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण मध्य...
शेडनेटगृह अनुदानाचे राज्यस्तरीय दरपत्रक...पुणे : धोरणात्मक कामकाजापासून शेतकरी प्रतिनिधींना...
स्ट्राॅबेरीची बाजारपेठ होतेय अधिक सक्षम महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
नाला खोलीकरणात गेलेे शेत; न्यायासाठी...अकोला ः उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा...
पावणेतीन हजार कोटींची ‘वसुंधरा’त...पुणे : कृषिविस्तार व सल्ला देण्याचे काम सोडून...
कांदा संचालनालयाला राष्ट्रीय संस्थेचा...पुणे : राजगुरुनगर भागात असलेल्या कांदा, लसूण...
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान...दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना...
राज्यात उष्णतेची लाट येणारपुणे : सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भात उन्हाचा...
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...