agriculture news in marathi, South Asian Climate Outlook Forum predicts normal monsoon | Agrowon

भारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊस
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 एप्रिल 2018

पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी भागांत मॉन्सूनचा पाऊस सर्वसामान्य पडेल, असा अंदाज साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रात यंदा सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे, तर आंध्र प्रदेश, ओडिशासह पूर्व-मध्य भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस; तर राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूरसह ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. फोरममार्फत गेल्या वर्षीही सामान्य पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी भागांत मॉन्सूनचा पाऊस सर्वसामान्य पडेल, असा अंदाज साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रात यंदा सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे, तर आंध्र प्रदेश, ओडिशासह पूर्व-मध्य भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस; तर राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूरसह ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. फोरममार्फत गेल्या वर्षीही सामान्य पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

गेल्या वर्षीच्या मॉन्सूनच्या पावसाचा आढावा आणि येत्या हंगामातील अंदाज व्यक्त करण्यासाठी दक्षिण आशियाई देशांच्या फोरमची बारावी दोन दिवसीय बैठक पुण्यात (१९-२० एप्रिल) झाली. भारतासह सर्व दक्षिण आशियाई देशांतील राष्ट्रीय व विभागीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्थांकडून माहिती विश्‍लेषण व विचारमंथनानंतर हा अंदाज जाहीर करण्यात आला. जगभरातील हवामान स्थिती, विविध हवामान मॉडेलचा विचार करून हा अंदाज तयार करण्यात आला आहे.

 प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागााचे तापमान सरासरीपेक्षा कमी असल्याने सध्या या भागात सौम्य ‘ला निना’ स्थिती आहे. ही स्थिती माॅन्सून सुरू होईपर्यंत सर्वसाधारण होईल, यावर सर्वच सहभागी शास्त्रज्ञांचे एकमत झाले. काही जागतिक मॉडेल्सच्या अभ्यासानुसार मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यात किंवा माॅन्सूननंतर प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढून ‘एल निनो’ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, ‘ला-निना’चे निवळून ‘एल-निनो’ स्थिती नेमकी केव्हा निर्माण होईल, याबाबत अनिश्‍चितता असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले.

इंडियन ओशन डायपोल, उष्णकटिबंधीय अटलांटिक समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, युरेशियन जमिनीचे तापमान आदी प्रादेशिक आणि जागतिक घटकांचा माॅन्सून क्षेत्रातील पावसावर परिणाम होऊ शकतो, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. दरम्यान, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाचा फरक म्हणजे इंडियन ओशन डायपोल (आयओडी) स्थिती सर्वसाधारण स्थितीत आहे, तर मॉन्सूनच्या मध्यावर ही स्थिती नकारात्मक होण्याची शक्यता आहे. उत्तर गोलार्धातील डिसेंबर, फेब्रुवारी महिन्यात बर्फाचे प्रमाण सर्वसाधारण होते, तर मार्च महिन्यापासून सरासरीपेक्षा अधिक होते. उत्तर गोलार्धातील हिवाळा व उन्हाळ्यातील बर्फाचे प्रमाण व आशियातील मॉन्सून यांच्यात परस्परविरोधी संबंध असतो.

महाराष्ट्रात सरासरीइतक्या पावसाचा अंदाज
‘सॅस्काॅफ’मार्फत पावसाच्या अंदाजाविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशानुसार महाराष्ट्रात सरासरीइतक्या पावसाची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भात सरासरीइतक्या पावसाची शक्यता ५० ते ६० टक्के, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ४० ते ५० टक्के आहे. कोकण, गोव्यासह कर्नाटक किनारपट्टी, विदर्भ, छत्तीसगड, झारखंडमध्ये सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. ओडिशा, आंध्र प्रदेशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता ४० ते ५० टक्के अाहे, तर तमिळनाडू, पश्‍चिम राजस्थान, गुजरातमधील कच्छ, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागलँड, मणिपूर राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.

इतर अॅग्रो विशेष
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...