agriculture news in marathi, south konkan to have heavy rainfall today | Agrowon

तळकोकणात मुसळधारेचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

पुणे  : माॅन्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान तयार झाल्याने तळ कोकणात आजपासून (ता. ५) मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला; तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. बुधवारपासून (ता.६) कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

पुणे  : माॅन्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान तयार झाल्याने तळ कोकणात आजपासून (ता. ५) मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला; तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. बुधवारपासून (ता.६) कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीलगत असलेली चक्राकार वाऱ्याची स्थिती, मॉन्सूनच्या वाटचालीस तयार झालेले हवामान, अरबी समुद्रावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा असल्याने किनारपट्टीलगत ढगांची दाटी झाली आहे. सोमवारी (ता. ४) सायंकाळी तळ कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाला सुरवात झाली होती. उद्यापासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात; तर शुक्रवारपासून (ता. ८) विदर्भात पाऊस जोर धरणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.   

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पूर्वमोसमी पावसाची धार सुरूच आहे. राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. सोमवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी; तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हेजरी लावली. कोकणातील रत्नागिरीच्या शिरगाव, मंडणगड, सिंधुदुर्गमधील मालवण, मध्य महाराष्ट्रातील साताऱ्याच्या माळवडी, सांगलीतील भाळवणी, ताकारी, वांगी, चिंचणी, मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील आंबड, बीडमधील धोंडराई, हिंगोलीतील डेहळेगाव, हट्टा यासह काही ठिकणी पावसाचा जोर अधिक होता. 

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस :

  • कोकण : रायगड-महाड ४०, तुडील ३५, कोंडवी ३३, वाकण ३७, रत्नागिरी- मार्ग ताम्हणे ३१, असुर्डे ४९, शिरगाव ६६, शिरशी ३७, अंबवली ५४, तळवली ३०, पाटपन्हाळे ३०, मंडणगड ६७, देव्हारे ३२, पाली ५५, फणसावणे ४८, म्हाबळे ३८, सिंधुदुर्ग - मालवण ६५, कणकवली ३५, फोंडा ३०, कडवळ ३३, माणगाव ९६, भेडशी ३२.
  • मध्य महाराष्ट्र : नगर-शेगाव ३०, सलाबतपूर ३०, सातारा- शेंदरे ३८, अंबवडे ४१, वडुथ ४८, कराड ३०, कुमथे ५०, शिरांबे ३८, खटाव ४६, पुसेगाव ४२, माळवडी ५९, म्हसवड ३५, लोणंद ३८, भुईंज ३५, सांगली - लेंगरे ३८, भाळवणी ५९, ताकारी ६१, पेठ ४०, खरसुंडी ३०, कुची ३५, हिंगणगाव ३३, कुंडल ४३, वांगी ६३, चिंचणी ६२, भोडसगाव ४३, कोल्हापूर - गगनबावडा ३२, अाजरा ३२.
  • मराठवाडा : औरंगाबाद- शेंदुरवाडा ३३, अांबड ५९, वातूर ४०, घनसांगवी ३२, बीड- धोंडराई ५७, लातूर-कासारबालकुंड - ३६, उस्मानाबाद-उमरगा ३५,  परभणी-सेलू ३६, हिंगोली-नर्सी ३३, येहळेगाव ५५, हट्टा ५९.विदर्भ : यवतमाळ-कोलंबी ३१, जांब ४१, गोंदिया-ठाणा ४३, चंद्रपूर- बेंबळ- ३३, सिंदवाही ३६, विहाड ४५, पाटण ३०, गडचिरोली अहेरी ४०. 

इतर अॅग्रो विशेष
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...