agriculture news in marathi, south maharashtra sugar crushing in slow mood | Agrowon

ऊसतोड कामगारांच्या तुटवड्याने हंगाम संथ गतीने
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 जानेवारी 2018

कोल्हापूर : करार केल्यापेक्षा ऊसतोडणी कामगार कमी प्रमाणात आल्याने दक्षिण महाराष्ट्रातील उसाचा यंदाचा हंगाम किमान एक महिना लांबण्याची शक्‍यता आहे. अंतिम टप्प्यात पडलेल्या पावसाने यंदा उसाच्या उत्पादनात एकरी पाच ते दहा टनांनी वाढ झाली आहे. यामुळे तोडणीस वेळ लागत आहे. यामुळेच तोडणीचा कार्यक्रमात एक महिना लांबण्याची शक्‍यता असल्याचे कारखाना प्रतिनिधींचे म्हणणे आहे. कोल्हापूर व सागंली दोन्ही जिल्ह्यांतील बहुतांशी कारखाने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालतील असा अंदाज आहे.

कोल्हापूर : करार केल्यापेक्षा ऊसतोडणी कामगार कमी प्रमाणात आल्याने दक्षिण महाराष्ट्रातील उसाचा यंदाचा हंगाम किमान एक महिना लांबण्याची शक्‍यता आहे. अंतिम टप्प्यात पडलेल्या पावसाने यंदा उसाच्या उत्पादनात एकरी पाच ते दहा टनांनी वाढ झाली आहे. यामुळे तोडणीस वेळ लागत आहे. यामुळेच तोडणीचा कार्यक्रमात एक महिना लांबण्याची शक्‍यता असल्याचे कारखाना प्रतिनिधींचे म्हणणे आहे. कोल्हापूर व सागंली दोन्ही जिल्ह्यांतील बहुतांशी कारखाने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालतील असा अंदाज आहे.

यंदाचा हंगाम नोव्हेंबरला सुरू झाला. पण वाफसा नसल्याने काही काळ तोडणी कार्यक्रम संथ गतीने चालला. वाफसा येण्यास सुरवात झाल्यानंतर तोडणी सुरू झाली खरी, पण तोडणी कामगारात घट झाली आणि उसाचे उत्पादनही वाढले. याचा परिणाम यंदाच्या हंगामावर दिसून येत आहे. शिवारात ऊस आहे. त्याची वेळेत तोड होत नसल्याने कारखान्याची गडबड सुरू झाली आहे. सध्या प्रत्येक कारखान्याचा निम्मा हंगाम आटपला आहे, पण शिवारात ऊस असल्याने त्याचा स्पष्ट दबाव तोडणी यंत्रणेवर येत आहे. 

सध्या आडसाली उसाच्या तोडणीही अंतिम टप्प्यात आहेत. यंदा खोडव्याबरोबर निडव्याच्या उत्पादनातही पाच ते दहा टनांनी वाढ झाली आहे. ऊसतोड लवकर होत नसल्याने शेतकऱ्यांची क्रमवारी उशिरा येत असल्याचे ऊस पट्ट्यातील चित्र आहे. जानेवारीच्या पहिल्या सप्ताहाअखेर कोल्हापूर व सागंली जिल्ह्यात एक कोटीहून अधिक मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा उसाच्या क्षेत्रात दहा ते पंधरा टक्क्‍यंनी वाढ झाली आहे, पण पाऊस नसल्याने उत्पादन घट येईल ही शक्‍यता मात्र प्रत्यक्ष ऊसतोडणीच्या वेळी फोल ठरली आहे. यातच मजुरांची टंचाई ही कारखान्यांची डोकेदुखी ठरली आहे. 

पुढील वर्षी बिकट स्थिती?
यंदा तोडीचा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी कसरत होत आहे. पुढच्या वर्षी तर ऊसलावणीत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. यामुळे पुढच्या हंगाम हा आणखी परीक्षा पाहणारा ठरेल, असा अंदाज आहे. सध्याचा तोडीची अवस्था पाहता फेब्रुवारीत हंगामसमाप्ती होणे अशक्‍य असल्याचे कारखानदार सूत्रांचे मत आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...