agriculture news in marathi, Sow the seeds by seed processing : chavan | Agrowon

बीजप्रक्रिया करूनच बियाण्यांची पेरणी करा : डॉ. प्रवीण चव्हाण
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

उस्मानाबादः शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करताना बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी महाविद्यालयाचे सहायक प्रा. डॉ. प्रवीण चव्हाण यांनी केले. दहिफळ (ता. कळंब) येथे `अॅग्रोवन` आणि `स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजीज लि.` यांच्या संयुक्त विद्यमाने `सोयाबीन व ऊस पीक व्यवस्थापन` या विषयावर ॲग्रोवन संवाद कार्यक्रमाचे बुधवारी (ता. २०) आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. नॅचरल शुगरचे संचालक पांडुरंग आवाड, महाधनचे प्रतिनिधी ज्ञानेश्‍वर पंडित, पोपटराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

उस्मानाबादः शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करताना बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी महाविद्यालयाचे सहायक प्रा. डॉ. प्रवीण चव्हाण यांनी केले. दहिफळ (ता. कळंब) येथे `अॅग्रोवन` आणि `स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजीज लि.` यांच्या संयुक्त विद्यमाने `सोयाबीन व ऊस पीक व्यवस्थापन` या विषयावर ॲग्रोवन संवाद कार्यक्रमाचे बुधवारी (ता. २०) आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. नॅचरल शुगरचे संचालक पांडुरंग आवाड, महाधनचे प्रतिनिधी ज्ञानेश्‍वर पंडित, पोपटराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. चव्हाण म्हणाले, सोयाबीनची उगवण क्षमता वाढावी, पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी बियाण्यांवर प्रक्रिया करण्याची गरज असते. यातून हेक्‍टरी उत्पादन वाढीस मदत होते. शिवाय असे पीक कीडरोगास लवकर बळी पडत नाहीत. त्यासाठी बीजप्रक्रिया ही अत्यावशक आहे. या वेळी सोयाबीन व्यवस्थापनावरही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. उसाच्या दोन ओळींतील अंतर पाच ते सात फूट ठेऊन लागवडीचा खर्च कमी करावा. तसेच यातून उत्पादन वाढही चांगली मिळते. त्यामुळे ऊस उत्पादकांनी अशा लहान गोष्टीचे तंतोतंप पालन करावे. कमी खर्चात जास्तीचे उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन नॅचरल शुगरचे संचालक तथा कृषिभूषण पांडुरंग आवाड यांनी केले.

खत, तण व्यवस्थापन करून ठिबकद्वारेच उसाला पाणी देणे गरजेचे असल्याचेही आवाड या वेळी म्हणाले. वसंत भातलवंडे, दत्तात्रेय कुटे, गंगाधर ढवळे, गोरख कागदे, भास्कर मते, पंढरीनाथ काळे, आश्रुबा भातलवंडे, नारायण काळे, नारायण भातलवंडे आदी शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बालाजी भातलवंडे, लक्ष्मण कास्ते, रोहित थोरवे, यांनी पुढाकार घेतला. ॲग्रोवनचे प्रतिनिधी बालाजी थोडसरे यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले.

इतर ताज्या घडामोडी
सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव    : काळी अळू...
खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार : पपई दरांमध्ये दर आठवड्याला...
जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर...कोल्हापूर/गडहिंग्लज : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर...
औरंगाबादेत खरबूज प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
विद्यापीठांपेक्षा शेतकरी संशोधनात...सांगली : सध्या विद्यापीठाच्या तंत्रज्ञानापेक्षा...
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...