agriculture news in marathi, Sowing of 1 lakh 65 hectare in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 जून 2018

नांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामामध्ये बुधवार (ता. २०)पर्यंत १ लाख ६४ हजार ९२६ हेक्टरवर (२० टक्के) पेरणी झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांनी दिली.

नांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामामध्ये बुधवार (ता. २०)पर्यंत १ लाख ६४ हजार ९२६ हेक्टरवर (२० टक्के) पेरणी झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये जूनच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे पेरणी योग्य ओलावा निर्माण झालेल्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ८ लाख २४ हजार ८२० हेक्टर आहे. बुधवार (ता. २०)पर्यंत १ लाख ६४ हजार ९२६ हेक्टरवर (२० टक्के क्षेत्रावर) पेरणी झाली आहे. पेरणी केलेल्या पिकांमध्ये सोयाबीन ४७ हजार २४० हेक्टर (२३.७३ टक्के), कपाशी ९३ हजार ५३५ हेक्टर (२८.९० टक्के), मूग २ हजार ११२ हेक्टर (७.०८ टक्के), उडीद २ हजार ११ हेक्टर (३.९९ टक्के), तूर १५ हजार ८४० हेक्टर (२२.६६ टक्के), ज्वारी ३ हजार ९०६ हेक्टर (३.४८ टक्के), मका ११६ हेक्टर (१२.३० टक्के) यांचा समावेश आहे.

नांदेड तालुक्यात १ हजार हेक्टर (३.१२ टक्के), अर्धापूर तालुक्यामध्ये २ हजार ६६६ हेक्टर (११.७४ टक्के), मुदखेड तालुक्यात १ हजार ३५३ हेक्टर (५.७३ टक्के), लोहा तालुक्यात ८ हजार ४१५ हेक्टर (९.७५ टक्के), कंधार तालुक्यात ९ हजार २०८ हेक्टर (१४.१८ टक्के), देगलूर तालुक्यात २६६ हेक्टर ((०.५९ टक्के), मुखेड तालुक्यात २ हजार ६७७ हेक्टर (३.४५ टक्के), नायगाव ४ जार १९ हेक्टर (८.४४ टक्के), बिलोली तालुक्यामध्ये २ हजार ३६३ हेक्टरवर (७.१५ टक्के), धर्माबाद ६ हजार ३७७ हेक्टर (२०.५५ टक्के), किनवट ६ हजार ८०४ हेक्टर (८.२६ टक्के), माहूर २३ हजार ६२८ हेक्टर (३९ टक्के), ५१ हजार ७३ (६१.५३ टक्के), हिमायतनगर २५ हजार ४५२ हेक्टर (६७.२८ टक्के), भोकर १७ हजार ५७० हेक्टर (२६.६८ टक्के), उमरी तालुक्यात १ हजार ९७५ हेक्टर (६.६७ टक्के) पेरणी झाली आहे. हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर तर देगलूर तालुक्यात सर्वांत कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

पावसाचा खंड पडल्यामुळे नुकत्याच पेरणी केलेल्या पिकांना पाण्याचा ताण बसला आहे. उन्हामुळे सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके सुकून जात होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेला पाऊस नुकत्याच उगवलेल्या पिकांसाठी फायदेशीर झाला आहे. उघडिपीमुळे लांबलेली पेरणी सुरू होण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...