नांदेड, परभणी, हिंगोलीत १२ लाख हेक्टरवर पेरणी

नांदेड, परभणी, हिंगोलीत १२ लाख हेक्टरवर पेरणी
नांदेड, परभणी, हिंगोलीत १२ लाख हेक्टरवर पेरणी

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामात शनिवार (ता. ७) पर्यंत १२ लाख ३८ हजार २२३ हेक्टरवर (७४.२४ टक्के) पेरणी झाली आहे. पेरणीक्षेत्रामध्ये सोयाबीन ५ लाख ८४ हजार २८७ हेक्टर (४७.१८ टक्के), कपाशी ३ लाख ९३ हजार २७९ हेक्टर (३१.७६ टक्के), तूर १ लाख १७ हजार ४९४ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे. तीनही जिल्ह्यांत सोयाबीनचा पेरा वाढला आहे. कपाशीचे क्षेत्र कमी झाले आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र १६ लाख ६७ हजार ६५२ हेक्टर आहे. शनिवार (ता. ७) पर्यंत १२ लाख ३८ हजार २२३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तब्बल ४ लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरणी राहिली आहे. नांदेड जिल्ह्यात ६ लाख ११ हजार ५९२ हेक्टरवर (७५.४३ टक्के) पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्रामध्ये सोयाबीन २ लाख ५३ हजार ३९५ हेक्टर, कपाशी २ लाख ३३ हजार ३६४ हेक्टर, तूर ४८ हजार ९२९ हेक्टर, उडिद २३ हजार ९१६ हेक्टर, ज्वारी २९ हजार २८४ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे.

परभणी जिल्ह्यात ३ लाख ७७ हजार ९९१ हेक्टरवर (७२.४३ टक्के) पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीन १ लाख ६४ हजार ७९५ हेक्टर, कपाशी १ लाख २७ हजार ६८७ हेक्टर, तूर ३२ लाख २९० हेक्टर, मूग ३१ हजार ८५८ हेक्टर, उडिद ७ हजार १११ हेक्टर, ज्वारी ९ हजार ९५० हेक्टर समावेश आहे.

हिंगोली जिल्ह्यात २ लाख ४३ लाख ६४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. पीकनिहाय पेरणी क्षेत्रामध्ये सोयाबीन १ लाख ६६ हजार ९७ हेक्टर, कपाशी ३२ हजार २२८ हेक्टर, तूर ३४ हजार २७५ हेक्टर, मूग ६ हजार १२९ हेक्टर उडिद ४ हजार १४९ हेक्टर, ज्वारी ४ हजार ३९७ हेक्टर या प्रमुख पिकांचा समावेश आहे. या तीन जिल्ह्यातील सरासरी पेरणी क्षेत्रापैकी ४७.१८ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. ३१.७६ टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.

पीक पेरणी जिल्हानिहाय स्थिती (हेक्टरमध्ये)
पीक नांदेड परभणी हिंगोली
सोयाबीन २५३३९५ १६४७९५ १६६०९७
कपाशी २३३३६४ १२७६८७ ३२२२८
तूर ४८९२९ ३४२९० ३४२७५
मूग २०८३२ ३१८५८ ६१२९
उडिद २३९१६ ७१११ ४१४९
ज्वारी २९२८४ ९९५० ४३९७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com