agriculture news in marathi, Sowing at 19 thousand hectare in Tasgaon taluka | Agrowon

तासगाव तालुक्यात १९ हजार हेक्‍टरवर पेरणी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

सांगली ः तासगाव तालुक्‍यात खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आला आहे. तालुक्‍यात १९ हजार ६३ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. तालुक्‍यात खरीप हंगामात भुईमूग, सोबायीनच्या क्षेत्रात घट झाली आहे. ज्वारी आणि मका पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

सांगली ः तासगाव तालुक्‍यात खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आला आहे. तालुक्‍यात १९ हजार ६३ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. तालुक्‍यात खरीप हंगामात भुईमूग, सोबायीनच्या क्षेत्रात घट झाली आहे. ज्वारी आणि मका पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

सध्या तासगाव तालुक्‍यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी थांबवली आहे. मात्र, वाफसा पाहून पेरणी करण्यासाठी शेतकरी पुढे येत असल्याचे चित्र आहे. तालुक्‍यात खरीप ज्वारीचे क्षेत्र १८ हजार ६२८ हेक्‍टर इतके असून, त्यापैकी १२ हजार ३२० हेक्‍टरवर ज्वारीची पेरा झाला आहे. सर्वाधित पेरा ज्वारीचा झाला आहे. गत हंगामात सोयाबीनला अपेक्षित दर मिळाला नाही. त्यात हमीभावाने सोयाबीनची विक्री करायची असल्यास सातबाऱ्यावर सोयाबीनची नोंद हवी ही अट शासनाने घातली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाऐवजी मका, ज्वारी पिकाची पेरणी करण्यासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे तालुक्‍यात ज्वारी आणि मका पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता आहे. कडधान्याच्या क्षेत्रातही वाढीची शक्‍यता आहे.

तालुक्‍यात यंदाच्या हंगामात सुमारे ३५ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी होण्याची शक्‍यता आहे. कृषी विभागाने खरीप पीक लागवडीबाबत मार्गदर्शन करत आहे. कृषी केंद्रात धान, तूर, मूग, उडिद व इतर पिकांचे बियाणे उपलब्ध आहेत. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तालुक्‍यातील शंभर टक्के पेरणी पूर्ण होईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे यांनी दिली.

तालुक्‍यातील पीकनिहाय पेरणी झालेले क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
पीक क्षेत्र
खरीप ज्वारी १२३२०
मका १४१५
तूर ५८८
उडीद ४४३
मूग १८८
कडधान्ये १३२
भुईमूग १५०७
सोयाबीन २४७०

 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...