agriculture news in marathi, Sowing of 2 lakh hectares in Hingoli district | Agrowon

हिंगोली जिल्ह्यात २ लाख हेक्टरवर पेरणी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार (ता. २७) पर्यंत २ लाख ४ हजार ८८३ हेक्टर (६०.२० टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली. सोयाबीन, तुरीचा पेरा वाढला आहे, तर कपाशीची लागवड कमी झाली आहे. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी माहिती दिली.

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार (ता. २७) पर्यंत २ लाख ४ हजार ८८३ हेक्टर (६०.२० टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली. सोयाबीन, तुरीचा पेरा वाढला आहे, तर कपाशीची लागवड कमी झाली आहे. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी माहिती दिली.

जिल्ह्यात यंदा खरिपाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ४० हजार ३१० हेक्टर आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसानंतर तसेच त्यानंतर पडलेल्या खंडानंतर आलेल्या पावसानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली. बुधवार (ता. २७) पर्यंत जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांत एकूण २ लाख ४ हजार ८८३ हेक्टरवर म्हणजेच्या सरासरी क्षेत्राच्या ६०.२० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. कपाशी, मूग, उडीद, ज्वारी, बाजरीच्या क्षेत्रात घट झाली आहे. सोयाबीनची पेरणी १ लाख ३२ हजार ६८ हेक्टर (९९.९५ टक्के), कपाशीची लागवड ३१ हजार १७१ हेक्टर (३६.९९ टक्के), तुरीची पेरणी २७ हजार ८०६  हेक्टर (९९.५२ टक्के), मूग ५ हजार ५९३ हेक्टर (३०.९५ टक्के), उडीद ३ हजार ६३१ हेक्टर (२२.११ टक्के), ज्वारी ३ हजार ७७० हेक्टर (८.४० टक्के), मक्याची ६५२ हेक्टर (९८.७९ टक्के).
सेनगाव तालुक्यात खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. यंदा  ६१ हजार ५३७ हेक्टरवर (१२०.९८ टक्के) पेरणी झाली आहे. हिंगोली तालुक्यात १६ हजार ३९ हेक्टर (२१.०९ टक्के), कळमनुरी तालुक्यातील ४९ हजार १९१ हेक्टर (७१.४४ टक्के), वसमत तालुक्यातील ३६ हजार ४७३ हेक्टर (४४.०२ टक्के), औंढा नागनाथ तालुक्यातील ४१ हजार ६४३ हेक्टर (६७.५० टक्के) पेरणी क्षेत्राचा समावेश आहे.

इतर बातम्या
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
दिवसागणिक रब्बी हंगामाची आशा धूसरऔरंगाबाद : जो दिवस निघतो तो सारखाच. परतीच्या...
खैरगावात दोन गुंठ्यांत कापसाचे २५ किलो...नांदेड ः खैरगाव (ता. अर्धापूर) येथील एका...
केन ॲग्रो कारखान्याला मालमत्ता जप्तीची...सांगली ः रायगाव (जि. सांगली) येथील केन ॲग्रो साखर...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
नाशिकमधील ९३ गावांचा पाहणी अहवाल सादरनाशिक : नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये कमी...
दसऱ्याच्या मुहूर्तासाठीच्या कांद्याला...उमराणे, जि. नाशिक : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या...
परभणी, राहुरी कृषी विद्यापीठांना पाच...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत कृषी...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
‘आरएसएफ’च्या मूळ सूत्रात घोडचूकपुणे: शेतकऱ्यांना हक्काचा ऊसदर मिळवून देणाऱ्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम...पुणे : पावसाला पोषक हवामान झाल्याने आठवड्याच्या...