नांदेड जिल्ह्यात ४ लाख ४२ हजार हेक्टरवर पेरणी

नांदेड जिल्ह्यात ४ लाख ४२ हजार हेक्टरवर पेरणी
नांदेड जिल्ह्यात ४ लाख ४२ हजार हेक्टरवर पेरणी

नांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये खरिपाच्या सरासरी क्षेत्राच्या निम्म्या क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. गुरुवार (ता. २८) पर्यंत ४ लाख ४२ हजार २६९ हेक्टर क्षेत्रावर (५४.९१ टक्के) पेरणी झाली. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांनी माहिती दिली.

जिल्ह्यात ऊस वगळून खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ०५ हजार ४७२ हेक्टर आहे. यंदा गुरुवारी (ता. २९) पर्यंत ४ लाख ४२ हजार २६९ हेक्टरवर (५४.९१ टक्के क्षेत्रावर) पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्रामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक म्हणजे १ लाख ६६ हजार ६३६ हेक्टर (८३.७३ टक्के) आहे. कपाशीची लागवड २ लाख २ हजार ६५५ हेक्टर (६२.६० टक्के) झाली आहे. अन्य पिकांमध्ये मूग १० हजार ६१० हेक्टर (३५.४१ टक्के), उडीद १२ हजार ८ हेक्टर (२३.४१ टक्के), तूर ३२ हजार ९४७ हेक्टर (४७.१४ टक्के), भाताची १३३ हेक्टर (३.१७ टक्के), ज्वारी १६ हजार ८६० हेक्टर (१५.०१ टक्के), मका १७३ हेक्टर (१८.३३ टक्के), तीळ १८७ हेक्टर (६.५७ टक्के),कारळ ५४ हेक्टर (५.९२ टक्के) समावेश आहे.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्रात नांदेड तालुक्यामध्ये १६ हजार १९७ हेक्टर (५०.५१ टक्के), अर्धापूर तालुक्यामध्ये १४ हजार ८०२  हेक्टर (६५.२० टक्के), मुदखेड तालुक्यामध्ये ८ हजार ५०६ हेक्टर (३६.०३ टक्के), लोहा तालुक्यात १३ हजार २४४ हेक्टर (१५.१६ टक्के), कंधार तालुक्यात ४५ हजार ३४ हेक्टर (६९.३७ टक्के), किनवट ५४ हजार ३७० हेक्टर (६६.०१ टक्के), माहूर ३१ हजार ६१० हेक्टर (५२.३१ टक्के), हदगाव तालुक्यात ७५ हजार ८५१ (९०.६७ टक्के), हिमायतनगर ३१ हजार ८८४ हेक्टर (८३.७६ टक्के), भोकर तालुक्यात २५ हजार २३८ हेक्टर (३८.३३ टक्के), उमरी तालुक्यात १८ हजार ६६५ हेक्टर (६३.०३ टक्के), देगलूर तालुक्यामध्ये १० हेक्टर ७३९ (२३.६८ टक्के), मुखेड तालुक्यामध्ये ३७ हजार ८५६ हेक्टर (४८.८२ टक्के), नायगाव ७ हजार ९७० हेक्टर (१६.७४ टक्के), बिलोली तालुक्यामध्ये २७ हजार ६०२ हेक्टरवर (८३.४९ टक्के), धर्माबाद २२ हजार ८४५ हेक्टर (७३.६० टक्के), पेरणी झाली आहे.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये पेरणी केली. परंतु त्यानंतर अनेक मंडळांमध्ये जवळपास आठवडाभर पावसाचा खंड पडल्याने पेरणी लांबली होती. गेल्या काही दिवसांपासून पाऊस परत सुरू झाला. त्यामुळे सध्या एकीकडे पेरणी केली जात असल्याचे तर दुसरीकडे सुरवातीच्या पेरणीच्या उगवलेल्या पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे सुरी असल्याचे चित्र गाव शिवारांमध्ये दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com