agriculture news in marathi, Sowing of 4 lakh hectares out of 16 lakh hectares in Khandesh | Agrowon

खानदेशात सुमारे ४ लाख हेक्‍टरवर पेरण्या
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जून 2018

``आमच्या भागात हलका व मध्यम पाऊस झाला आहे. पेरण्या काही शेतकऱ्यांनी सुरू केल्या आहेत. तर अनेकांनी धूळपेरणी केली आहे.`` 
- रोहित पटेल, शेतकरी, वडछील, 
ता. शहादा, जि. नंदुरबार

जळगाव : खानदेशातील सुमारे १६ लाख हेक्‍टर खरिपाखाली नियोजित क्षेत्रातील ४ लाख हेक्‍टवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात सुमारे १ लाख ३५ हजार हेक्‍टवर पूर्वहंगामी कापसाची लागवड झाल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे. 

या महिन्याच्या सुरवातीला पाऊस होता. नंतर आठवडाभर पाऊस कुठेही नव्हता. या आठवड्यात पुन्हा धुळे, नंदुरबार, जळगाव भागांत कमी अधिक पाऊस अनेक ठिकाणी झाला. जळगाव जिह्यात भडगाव, पाचोरा, चाळीसगाव भागांत अनेक शेतकऱ्यांनी या महिन्याच्या सुरवातीला झालेल्या वादळी किंवा पूर्वमोसमी पावसावर मका, ज्वारी व कडधान्याची पेरणी उरकली होती. त्यात काळ्या कसदार जमिनीतील पिके तग धरून होती. परंतु हलक्‍या भागात दुबार पेरणी करावी लागत आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात सुमारे ९० हजार हेक्‍टवर, तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे ४५ हजार हेक्‍टवर पूर्वहंगामी कापूस लागवड झाली आहे.

तापी, गिरणा व वाघू नदीच्या लाभक्षेत्रात कापूस लागवड अधिक आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा भागांत पूर्वहंगामी कापूस बऱ्यापैकी आहे. तर धुळे जिल्ह्यात दक्षिण धुळे, शिरपूर आणि शिंदखेडामधील तापी काठावर कापूस लागवड झाली आहे. 

जळगाव जिल्ह्यात सात लाख ६५ हजार हेक्‍टवर खरीप उभा राहणार असून, जिल्ह्यात सुमारे अडीच लाख हेक्‍टवर पेरण्या (पूर्वहंगामी कापूस लागवड धरून) झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यात चार लाख २० हजार हेक्‍टवर खरिपात पेरण्या होतील. जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्‍टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. तर नंदुरबारातही पाच लाख हेक्‍टवर खरिपात पेरण्या व लागवडी होणार असून, सुमारे ९० ते ९५ हजार हेक्‍टवर पेरण्या झाल्या आहेत.

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...