नांदेड जिल्ह्यात ७ लाख ४७ हजार हेक्टरवर पेरणी

नांदेड जिल्ह्यात ७ लाख ४७ हजार हेक्टरवर पेरणी
नांदेड जिल्ह्यात ७ लाख ४७ हजार हेक्टरवर पेरणी

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ७ लाख ४७ हजार ३१३ हेक्टरवर (९२.७८ टक्के) पेरणी झाली आहे. बहुतांश भागातील पेरण्या उरकल्या आहेत; परंतु अद्याप अंतिम पेरणी क्षेत्र निश्चित करण्यात आले नाही. बुधवार (ता. २५) पर्यंतच्या पेरणी अहवालानुसार यंदा जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात सरासरीपेक्षा १ लाख २६ हजार १०९ हेक्टरने वाढ झाली आहे, तर कपाशीच्या क्षेत्रात ५८ हजार ८५७ हेक्टरने घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.

तुरीच्या पेरणी क्षेत्रात ८ हजार ९६७ हेक्टरने घट झाली आहे. मुगाच्या क्षेत्रात ३ हजार ६७५ हेक्टरने, उडिदाच्या क्षेत्रात २२ हजार ३२८ हेक्टरने, ज्वारीच्या क्षेत्रात ७३ हजार ७१० हेक्टरने, भाताच्या क्षेत्रात ३ हजार २१६ हेक्टरने घट झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९९ हजार ८९ हेक्टर असताना यंदा ३ लाख २५ हजार २५८ हेक्टरवर म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या १६३.३७ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख २३ हजार ७५४ हेक्टर आहे; परंतु यंदा २ लाख ६४ हजार ८९७ हेक्टरवर लागवड झाली आहे. तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ६९ हजार ८९८ हेक्टर आहे. परंतु यंदा ६० हजार ८५९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

यंदा सर्वच तालुक्यात सोयाबीनचा पेरा सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त झाला आहे; परंतु किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, कंधार, लोहा तालुक्यात सोयाबीनपेक्षा कपाशीचे लागवड क्षेत्र जास्त आहे. बिलोलीत सर्वाधिक सरासरी क्षेत्राच्या १३७.०६ टक्के क्षेत्रावर तर भोकर तालुक्यात सर्वात कमी ६९.०४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. देगलूर, बिलोली, किनवट तसेच लोहा तालुक्यात ९७५ हेक्टरवर भात लागवड झाली. यंदा भाताच्या क्षेत्रात ३ हजार हेक्टरने घट झाली आहे.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका पेरणी क्षेत्र
नांदेड     ३०७८२
अर्धापूर     २२१०१
हदगाव     ७५८५१
हिमायतनगर     ३७८२८
किनवट     ७८६६०
माहूर     ३३७४७
भोकर     ४५४५६
मुदखेड     १६७९०
उमरी     ३०९०६
धर्माबाद     ३०४१२
बिलोली     ४५३१०
देगलूर     ४८५२७
नायगाव     ४६६८३
मुखेड     ७६६८१
कंधार     ६३७९७
लोहा     ६६११२
जिल्ह्यातील पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक क्षेत्र
सोयाबीन  ३२५२५८
कापूस २६४८९७
तूर  ६०८५९
ज्वारी  ३८६३४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com