agriculture news in marathi, Sowing of 94 thousand hectare in Hingoli district | Agrowon

हिंगोली जिल्ह्यात ९४ हजार हेक्टरवर पेरणी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जून 2018

हिंगोलीः जिल्ह्यात बुधवार (ता. २०) पर्यंत ९४ हजार २६२ हेक्टरवर म्हणजेच २७.७० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी दिली.

हिंगोलीः जिल्ह्यात बुधवार (ता. २०) पर्यंत ९४ हजार २६२ हेक्टरवर म्हणजेच २७.७० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी दिली.

जिल्ह्यात यंदा ३ लाख ४० हजार ३१० हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी होईल, अशी शक्यता आहे. जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात झालेल्या पावसानंतर सर्वच तालुक्यांतील शेतकऱ्यांनी पेरणी केली. खासकरून कापूस, हळद लागवड तसेच सोयाबीन, तूर, मूग, उडिदाच्या पेरणीवर भर दिला. हिंगोली, कळमनुरी, सेनगांव तालुक्यात पेरण्याची गती अधिक होती. वसमत, औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरणी होऊ शकली नाही. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे लांबणीवर पडेलल्या पेरण्यांना सुरवात झाली आहे.

बुधवार (ता. २०) पर्यंत जिल्ह्यांमध्ये ९४ हजार २६२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील १६ हजार ३९ हेक्टर (२१.०९ टक्के), कळमनुरी तालुक्यातील ४२ हजार ३५२ हेक्टर (६१.५० टक्के), वसमत तालुक्यातील ५ हजार ७१० हेक्टर (६.९० टक्के), औंढा नागनाथ तालुक्यातील ५ हजार ३८४ हेक्टर (८.७ टक्के), सेनगांव तालुक्यातील २४ हजार ७७६ हेक्टर (४८.७० टक्के) क्षेत्राचा समावेश आहे. पीकनिहाय पेरणी क्षेत्राचा विचार केला असता सोयाबीन ६२ हजार ९३३ हेक्टर (४७.६३ टक्के), कापूस ११ हजार ६७३ हेक्टर (१३.८५ टक्के), तूर ११ हजार ३२८ हेक्टर (४०.४४ टक्के), मूग १ हजार ९०४ हेक्टर (१०.५४ टक्के), उडिद १ हजार ७९९ हेक्टर (१०.९६ टक्के), ज्वारी १ हजार ४०१ हेक्टर (३.१२ टक्के), मका २३१ हेक्टर (३५ टक्के), हळद २ हजार ९९३ हेक्टर या पिकांचा समावेश आहे.

इतर ताज्या घडामोडी
सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव    : काळी अळू...
खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार : पपई दरांमध्ये दर आठवड्याला...
जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर...कोल्हापूर/गडहिंग्लज : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर...
औरंगाबादेत खरबूज प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
विद्यापीठांपेक्षा शेतकरी संशोधनात...सांगली : सध्या विद्यापीठाच्या तंत्रज्ञानापेक्षा...
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...