agriculture news in marathi, sowing become in risk, yavatmal, maharashtra | Agrowon

यवतमाळमध्ये कोरडवाहू क्षेत्रातील पेरण्या धोक्‍यात येण्याची शक्‍यता
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जून 2018

यवतमाळ  : पावसाच्या सरी बरसताच जिल्ह्यातील तब्बल दोन लाख १६ हजार हेक्‍टरवर खरीप पेरणी झाली. यंदा १२ ते २२ जूनदरम्यान पाऊस होणार नसल्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे आता कोरडवाहू शेतजमिनीवरील लागवड व पेरणी केलेले पिकं धोक्‍यात येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

यवतमाळ  : पावसाच्या सरी बरसताच जिल्ह्यातील तब्बल दोन लाख १६ हजार हेक्‍टरवर खरीप पेरणी झाली. यंदा १२ ते २२ जूनदरम्यान पाऊस होणार नसल्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे आता कोरडवाहू शेतजमिनीवरील लागवड व पेरणी केलेले पिकं धोक्‍यात येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

रोहिणी व मृगनक्षत्रात जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. जून महिन्याच्या सुरवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी समाधानी होते. पावसाचा अंदाज घेत अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली. मागील आठ दिवसांत जिल्ह्यात तब्बल दोन लाख १६ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. मात्र, आता पावसाचा खंड पडला आहे. आणखी पाच ते सात दिवस पाऊस येण्याची शक्‍यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अशा स्थितीत पेरणी केलेले शेतकरी अडचणीत येण्याची दाट शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे.

६५ मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले असले तरी शेतकऱ्यांपर्यंत याबाबत मार्गदर्शन पोहोचलेच नाही. त्यामुळे अगदी कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. सध्या जमिनीत काही प्रमाणात ओलावा आहे. एक-दोन दिवसांत पावसाची सर आल्यास पिकांना धोका नाही. मात्र, पाच ते सहा दिवस विलंब झाल्यास मोठी अडचण निर्माण होण्याचा अंदाज शेतकऱ्यांचा आहे.

ज्या शेतकऱ्यांजवळ ओलिताची सुविधा आहे, अशांना सध्यातरी चिंता नाही. परंतु, कोरडवाहू शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बियाणे खरेदी करताना कृषी केंद्रचालक किंवा कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे होते. परंतु, बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली नसल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडण्याची दाट शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

यंदा साधारणतः चार लाख ७० हजार हेक्‍टरवर कापूस लागवड होण्याचा अंदाज आहे. यापैकी आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख ७१ हजार २८० हेक्‍टरवर कापसाची लागवड करण्यात आलेली आहे. पेरणीची स्थिती (हेक्‍टर) ः गळीत धान्य ः २०,२७१, कडधान्य ः २१, ८२५, तृणधान्य ः ६६, नगदी पीकं ः एक लाख ७३ हजार.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...