agriculture news in marathi, sowing become slow due to low rain, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात पावसाअभावी पेरणीसह शेतीची कामे थांबली
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जून 2018

नगर  ः जिल्ह्यात पावसाळा सुरू झाला असला, तरी अद्याप अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणीसह शेतीची कामे रखडली आहेत. आतापर्यंत अकोले तालुक्‍यात भात लागवड, तर राहुरी तालुक्‍यात कापूस लागवडीला सुरवात झाली आहे. सुरवातीच्या काळात पाऊस झाला नसल्याने मूग, उडदाचे क्षेत्रही कमी होण्याचा अंदाज आहे.

नगर  ः जिल्ह्यात पावसाळा सुरू झाला असला, तरी अद्याप अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणीसह शेतीची कामे रखडली आहेत. आतापर्यंत अकोले तालुक्‍यात भात लागवड, तर राहुरी तालुक्‍यात कापूस लागवडीला सुरवात झाली आहे. सुरवातीच्या काळात पाऊस झाला नसल्याने मूग, उडदाचे क्षेत्रही कमी होण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात खरिपात ४ लाख २४ हजार ४९६ हेक्‍टर क्षेत्रावर खरीप पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यानुसारच कृषी विभागाने खते, बियाणे व अन्य उपाययोजनांचे नियोजन केले आहे. पावसाळा सुरू होऊन आठ दिवसांचा कालावधी झाला असला, तरी अजूनही पाऊस नाही. गतवर्षी सुरवातीला चांगला पाऊस झाला होता, त्यामुळे मूग व उडदाचे क्षेत्र वाढले होते.

यंदा मात्र सुरवातीलाच पावसाने खंड दिल्यामुळे मूग, उडदाचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत फक्त राहुरी तालुक्‍यात १६९८ हेक्‍टरवर कापूस, तर अकोल्यात ७२ हेक्‍टरवर भाताची लागवड झाली आहे. दरवर्षी या काळात अकोले तालुक्‍याच्या पूर्व भागातील आदिवासी पट्ट्यात जोरदार पाऊस सुरू असतो.
यंदा अजून त्या भागातही पाऊस नाही. मात्र पाऊस येण्याची शक्‍यता गृहीत धरून भात लागवडीसाठी मात्र आदिवासी भागात कामांची लगबग सुरू आहे. जामखेड, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, नेवासा भागात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. अजून कोठेही लागवड झाली नाही.

यंदा पुर्वमोसमी पावसाने बहुतांश भागात जोरदार हजेरी लावली. मॉन्सूनच्या आगमनानंतर साधारण २२ जूनपर्यंत पावसात खंड पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने शेतकऱ्यांना सूचित करत चांगला पाऊस होईपर्यत पेरणी, कापूस लागवड न करण्याचे आवाहन केले. त्याचा परिणाम म्हणून लागवड, पेरणी झाली नाही. अन्यथा नेहमीप्रमाणे पेरणी करून पुन्हा दुबार पेरणीचे संकट उभा राहिले असते.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...