अकोला, वाशीम जिल्ह्यांत अाजवर ७० टक्के पेरण्या

अकोला, वाशीम जिल्ह्यांत अाजवर ७० टक्के पेरण्या
अकोला, वाशीम जिल्ह्यांत अाजवर ७० टक्के पेरण्या

अकोला : पावसाळा सुरू होऊन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला. या काळात वऱ्हाडात अकोला व वाशीममध्ये बुलडाण्याच्या तुलनेने परिस्थिती ठिक अाहे. या दोन्ही जिल्ह्यात पेरण्यांनी वेग घेतलेला असून, येत्या काही दिवसांत त्या पूर्ण होऊ शकतील. बुलडाणा जिल्ह्यात मात्र अातापर्यंत ४५ टक्क्यांच्या वर क्षेत्र अद्याप लागवडीखाली अालेले नाही. किमान २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होणे बाकी अाहे.

अकोला व वाशीम जिल्ह्यांत मागील आठवडाभरात झालेल्या पावसामुळे अाजवर ७० टक्क्यांपेक्षा पेरणीचे क्षेत्र पोचले अाहे. या ठिकाणी पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. बुलडाण्यात दर दिवसाला परिस्थिती बिकट होत चालली अाहे. या जिल्ह्यात अातापर्यंत ५७ टक्के क्षेत्र लागवडीखाली अाल्याचे सांगितले जाते. त्यात घाटावरील तालुक्यांमध्ये पेरणीची स्थिती चांगली अाहे. चिखली, मेहकर, मलकापूर, मोताळा या तालुक्यांमध्ये ९० टक्क्यांवर पेरण्या झाल्या आहेत. तर  दुसरीकडे याच जिल्ह्यात पावसाच्या अनियमितपणामुळे संग्रामपूर तालुक्यात सर्वांत कमी १४ टक्के, जळगाव जामोदमध्ये १८ टक्के पेरण्या झाल्या. नांदुरा तालुक्यातही २० टक्क्यांवर पेरणी झालेली नाही.

पावसाच्या अनियमितपणाचा फटका कपाशी लागवडीला बसण्याची चिन्हे अाहेत. कपाशीसारखे पीक पेरायचे की नाही, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची तयार झाली. परिणामी, सोयाबीन लागवड क्षेत्रात पुन्हा भर पडण्याची शक्यता अाहे. गेल्या हंगामात बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे अार्थिक नुकसान झालेल्या अनेकांनी कपाशीकडे पाठ फिरवण्याचा निर्णय घेतला होता. अाता या पावसामुळे अाणखी शेतकरी सोयाबीन व इतर पिकांकडे वळू शकतात. यामुळे बियाणे उत्पादक कंपन्यांना झळ बसू शकते. तर सोयाबीन बियाण्यांची मागणी अाणखी वाढू शकते. महाबीजचे बियाणे संपले अाहेत.

 गेल्या दोन हंगामांप्रमाणेच याही वेळी वऱ्हाडातील पेरण्यांमध्ये तफावत तयार झाली. सुरवातीच्या काळात लावलेली पिके एक महिन्याची बनली तर काही पिके १० ते १५ दिवस कालावधीची अाहेत. काही ठिकाणी अद्याप पेरणीही करता अालेली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com