agriculture news in marathi, Sowing of dryland of rabbi in Khandesh | Agrowon

खानदेशातील तापीकाठी रब्बीची कोरडवाहू पेरणी
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

जळगाव : खानदेशातील तापी नदीकाठच्या काळ्या कसदार जमिनीत कोरडवाहू रब्बी पिकांमध्ये दादर (ज्वारी) व हरभऱ्याची पेरणी सुरू झाली आहे. गिरणा पट्ट्यात अजून पेरणी सुरू झालेली नसल्याचे चित्र आहे. खानदेशात दादर, हरभरा, मका मिळून सुमारे १२ ते १३ हजार हेक्‍टवर पेरणी झाल्याचा अंदाज आहे.

जळगाव : खानदेशातील तापी नदीकाठच्या काळ्या कसदार जमिनीत कोरडवाहू रब्बी पिकांमध्ये दादर (ज्वारी) व हरभऱ्याची पेरणी सुरू झाली आहे. गिरणा पट्ट्यात अजून पेरणी सुरू झालेली नसल्याचे चित्र आहे. खानदेशात दादर, हरभरा, मका मिळून सुमारे १२ ते १३ हजार हेक्‍टवर पेरणी झाल्याचा अंदाज आहे.

हवेतील आर्द्रतेवर येणारे पीक म्हणून दादरची ओळख आहे. त्याची पेरणी खानदेशात तापी काठावरील तालुक्‍यांमध्ये अधिकची असते. तसेच पाचोरा, भडगाव व चाळीसगाव भागातही पेरणी केली जाते. यंदा पारोळा पश्‍चिम व उत्तर, शिंदखेडा व अमळनेरातील पूर्व, दक्षिण भागात हंगाम बिकट आहे. भडगाव व चाळीसगावमधील धुळ्याकडील भागातही स्थिती बिकट आहे. विहिरींचे पाणी खोल गेल्याने गव्हाची पेरणी अपेक्षित होणार नाही.
चोपडा, रावेर, यावल, शिंदखेडा, जळगाव व अमळनेरचा तापीकाठ, शहादा, तळोदा, मुक्ताईनगर, भुसावळ या तालुक्‍यांमध्ये रब्बीची बऱ्यापैकी पेरणी होईल. अन्य कृत्रिम जलसाठ्याच्या भागातही पेरणी होईल. दादरची पेरणी चोपडा, जळगाव, शिंदखेडामधील तापीकाठ आदी भागात झाली आहे. काही ठिकाणी तर ज्वारीचे पीक तरारले आहे. हरभरा पेरणी या आठवड्यात काही भागात सुरू झाली आहे. शासकीय महामंडळाच्या हरभरा बियाण्याला शेतकऱ्यांची पसंती आहे.  चारा व धान्य देणारे पीक म्हणून यावल, जळगाव भागात काही शेतकऱ्यांनी मका लागवडही सुरू केली आहे.

मक्‍याची लागवड पुढे वाढेल. सध्या फारशी लागवड नाही. काही शेतकऱ्यांनी उडीद, मूग व आता सोयाबीनच्या रिकाम्या झालेल्या क्षेत्रात लागवड केली आहे. ज्वारीची सुमारे पाच ते सहा हजार हेक्‍टवर पेरणी आटोपल्याची माहिती आहे. मक्‍याची तीन ते साडेतीन हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचीदेखील सुमारे अडीच ते तीन हजार हेक्‍टवर पेरणी झाल्याचा अंदाज आहे.

इतर बातम्या
खानदेशात दुष्काळ निवारणात अडचणीजळगाव : दुष्काळी व पिण्याच्या पाण्याची तीव्र...
सरपंच परिषदेची ताकद दाखवू नगर  ः सरकार शहरांचे पोषण करण्यासाठी...
संत्रा, मोसंबी बागांचे नव्याने सर्वेक्षणनागपूर : जिल्ह्यातील काटोल, नरखेड व कळमेश्‍वर...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
‘अक्कलपाडा’चे पाणी न पोचल्याने...धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत...
नानेगावकरांचा ग्रामसभेतून प्रस्तावित...नाशिक : नाशिक पुणे प्रस्तावित रेल्वे महामार्ग...
सोलापूर जिल्ह्यातील खरीप नुकसानीपोटी ३८...सोलापूर : खरीप हंगामातील नुकसानीपोटी जिल्ह्यातील...
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
द्राक्ष बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची...पांगरी, जि. सोलापूर : बार्शी तालुक्यातील पूर्व व...
नागालँड राज्य बँक राबविणार पुणे जिल्हा...पुणे ः शेती, शेतीपूरक व्यवसायासाठी पुणे जिल्हा...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप वेगातसातारा ः जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात सुरू...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
पुणे विभागात दहा लाख हेक्टर क्षेत्र...पुणे ः पाणी टंचाईमुळे रब्बीच्या पेरण्यांच्या...
शेतकरी सन्मान योजनेसाठी सात हजार...उस्मानाबाद ः तालुक्‍यातील २४ गावांतून सात हजार...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...