agriculture news in marathi, Sowing of farmers by the soyabeans lost income | Agrowon

सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

अमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे देणाऱ्या सोयाबीन पिकाने यंदा शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे. एकीकडे कापणीची मजुरी देऊन शेतकरी गारद झालेला असतानाच दुसरीकडे सोयाबीनला भाव मिळत नसल्याची बिकट स्थिती आहे.

अमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे देणाऱ्या सोयाबीन पिकाने यंदा शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे. एकीकडे कापणीची मजुरी देऊन शेतकरी गारद झालेला असतानाच दुसरीकडे सोयाबीनला भाव मिळत नसल्याची बिकट स्थिती आहे.

यंदा पावसाळा वेळेत सुरू झाला. शेतकऱ्यांनी वेळेवर म्हणजे पाच जुलैपर्यंत पेरण्या आटोपल्यात. जून, जुलै व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस पडला; परंतु सोयाबीन भरण्यास सुरवात झाली तेव्हा आवश्‍यकता असताना पावसाने प्रदीर्घ दडी मारली. त्यामुळे सोयाबीन पाहिजे त्या प्रमाणात भरले नाही. कुठे कुठे दाणाही बारीक पडला तर कुठे सोयाबीनचे पूर्णतः नुकसान झाले. ज्यांचे सोयाबीन थोडेफार टिकले, त्यांची स्थिती अतिशय बिकट आहे.

जिल्ह्यात दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह, मेळघाट आणि मध्य प्रदेशातून सोयाबीनच्या कापणीला मजूर येतात. यंदा हा मजूर फार कमी प्रमाणात आला आहे. गावातील मजुरांची संख्यादेखील घटली आहे. सोयाबीन काढणीचा दर क्‍विंटलमागे १९० ते २०० रुपयांच्या घरात आहे. त्यातच सोयाबीनचे उत्पादन यंदा घटले. काढणीचा खर्च पाहता शेतकऱ्याला तोटा सोसावा लागणार अशी चिन्हे आहेत.

यंदा नको तेव्हा पाऊस पडल्यामुळे सोयाबीनच्या प्रत्येकाच्या शिवारात गवत, फुलोरा, तरोटा, गाजरगवत यांसारखे तण मोठ्या प्रमाणात वाढले. यावर काही शेतकऱ्यांनी तणनाशक फवारणी केली; मात्र त्याचा फारसा फरक पडला नाही. त्यामुळे सोयाबीन कापणीला जेथे दोन दिवस लागायचे तेथे पाच दिवस लागले. यामुळे खर्चच वाढत चालला असून, सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्याच्या अनेक भागांत क्‍विंटलमध्ये नाही, तर एकरी अवघ्या काही किलोंमध्ये सोयाबीनची उत्पादकता झाली आहे. त्यातच पिकाची कापणी आणि मळणीवर अधिक खर्च होत असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक ताळेबंदच जुळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शासनाने याची दखल घेत जिल्ह्यात सर्वदूर दुष्काळ जाहीर करावा, अशी अपेक्षा आहे.
- विठ्ठलराव काळे, शेतकरी, चांदई, जि. अमरावती.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...