agriculture news in marathi, Sowing of Jalgaon and Dhule districts finish | Agrowon

जळगाव, धुळे जिल्ह्यांतील पेरणी आटोपली
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

जळगाव : धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याची पेरणी अधिक झाली असून, एकट्या जळगाव जिल्ह्यात यंदा विक्रमी ९५ हजार हेक्‍टरवर हरभरा पेरणी झाल्याचा अंदाज आहे. रब्बी पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. मका लागवड अजूनही काही भागांत सुरू असल्याचे चित्र आहे.

जळगाव : धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याची पेरणी अधिक झाली असून, एकट्या जळगाव जिल्ह्यात यंदा विक्रमी ९५ हजार हेक्‍टरवर हरभरा पेरणी झाल्याचा अंदाज आहे. रब्बी पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. मका लागवड अजूनही काही भागांत सुरू असल्याचे चित्र आहे.

बोंड अळीने कपाशीचे नुकसान झाल्याने क्षेत्र रिकामे करून शेतकऱ्यांनी कमी पाणी व कमी खर्चात येणाऱ्या हरभरा पिकाची पेरणी केली. यंदा ८५ हजार हेक्‍टरवर हरभरा पेरणी अपेक्षित होती. परंतु कपाशी काढून रिकाम्या झालेल्या क्षेत्रावर हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी झाल्याने क्षेत्र ९५ हजार हेक्‍टरवर पोचले आहे. सर्वाधिक १९ हजार हेक्‍टर पेरणी रावेरात झाली आहे.

यापाठोपाठ यावल, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, अमळनेर, पाचोरा, भडगाव भागांत पेरणी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी यंदा ट्रॅक्‍टरने हरभरा पेरणीवर भर दिला. कपाशीवर नांगर फिरवून लागलीच दुसऱ्या दिवशी शेत भुसभुशीत केले जायचे आणि तिसऱ्या दिवशी त्यावर हरभरा पेरणीची लगबग अनेक भागांत यंदा दिसून आली. धुळे जिल्ह्यात सुमारे ३५ हजार हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाल्याची माहिती आहे.

गव्हाची पेरणी बरी, मकाही चांगला
धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात गव्हाची पेरणी बरी आहे. तापीकाठाजवळील गावांमध्ये मक्‍यासह गहू अधिक आहे. जळगावात सुमारे २९ हजार हेक्‍टर तर धुळ्यातही सुमारे ११ हजार हेक्‍टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. यंदा थंडी हवी तशी नसल्याने गव्हाची वाढ जोमात नाही. परंतु उगवण चांगली झाली आहे. मक्‍याची लागवड किंवा पेरणीकडेही शेतकऱ्यांचा कल होता. चारा व चांगले उत्पन्न म्हणून मक्‍याची पेरणी झाली. चोपडा, शिरपूर, जळगाव, पाचोरा भागात मका पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे ३५ हजार हेक्‍टर, तर धुळ्यातही १० ते ११ हजार हेक्‍टरवर मक्‍याची पेरणी झाली आहे.

बाजरीला प्रतीक्षा
अजून बाजरीची पेरणी सुरू झालेली नाही. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणीला सुरवात होईल. कपाशी व तुरीच्या रिकाम्या होणाऱ्या क्षेत्रावर बाजरीची पेरणी होईल. जळगाव जिल्ह्यात सुमारे चार ते पाच हजार हेक्‍टरवर बाजरी पेरणीचा अंदाज आहे.

दादरने उद्दिष्ट गाठले
जळगाव जिल्ह्यात ३२ हजार हेक्‍टरवर दादर पेरणीचे उद्दिष्ट होते. तर धुळ्यात १५ हजार हेक्‍टरवर पेरणीचे उद्दिष्ट होते. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दादर पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. दिवाळीनंतर दादर पेरणीला वेग आला होता. धुळ्यात शिरपूर, शिंदखेडामधील तापीकाठालगतचा भाग, धुळे येथे पेरणी झाली आहे. तर जळगाव जिल्ह्यातही जळगाव, चोपडा, येथे अधिकची पेरणी झाली आहे.

आमच्या भागातील शेतकऱ्यांनी हरभऱ्याला पसंती दिली आहे. मका पेरणी काही भागात सुरू आहे.
- निंबा नारायण पाटील,
डोमगाव, (जि. जळगाव)

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...