जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुत
ताज्या घडामोडी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा ५४ हजार २९७ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. सोयाबीनने १०० ची टक्केवारी ओलांडली आहे. तुरीची आतापर्यंत ८८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा ५४ हजार २९७ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. सोयाबीनने १०० ची टक्केवारी ओलांडली आहे. तुरीची आतापर्यंत ८८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ७९ हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित केले आहे. त्यापैकी ५४ हजार २९७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणीची एकूण टक्केवारी ६९ टक्के इतकी आहे. जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीन व तुरीचे क्षेत्र वाढतच चालले आहे. मात्र, दर पाच वर्षांच्या सरासरी पेरणीचे क्षेत्र काढून एकूण पेरणीचे क्षेत्र निश्चित केले जात असल्यामुळे पेरणीच्या क्षेत्राचे आकडे खूपच कमी असल्याचे दिसून येते.
मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने खरिपामध्ये तूर व सोयाबीन या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. साहजिकच त्याचा परिणाम रब्बीच्या पेरणीवर होत असल्याचे दिसून येते. तुरीसाठी २४ हजार ४५ हेक्टर क्षेत्र निर्धारित केले असताना प्रत्यक्षात २१ हजार ११४ हेक्टरवर त्याची पेरणी झाली आहे. तीच स्थिती सोयाबीनबाबतही आहे.
सोयाबीनसाठी केवळ पाच हजार ४५१ हेक्टर क्षेत्र निर्धारित केले आहे. प्रत्यक्षात पाच हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीनची पेरणी जवळपास ३० ते ४० हजार हेक्टरवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मकेची ५ हजार ७१३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. १० हजार ८०५ हेक्टरवर उडीद, तर दीड हजार हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी झाली आहे. अक्कलकोट, बार्शी या तालुक्यांमध्ये खरिपाच्या पेरण्यांचा जोर दिसून येतो.
- 1 of 348
- ››