agriculture news in marathi, Sowing out; wait for Awesome rain | Agrowon

पेरण्या खोळंबल्या; जोरदार पावसाची प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जून 2018

``यंदा तीन एकरांवर भात लागवड करणार आहे. अर्धा एकरावर भुईमुगाची पेरणी करणार आहे. भात लागवडीसाठी एकूण पंधरा ते वीस गुंठ्यांवर रोपवाटिका टाकली आहे. पावसासाठी वातावरण आहे, परंतु पाऊस पडत नाही.`` 
- रोहिदास संतू लखिमले, शेतकरी, भोयरे, ता. मावळ.

``मी सोयाबीनची दोन एकरांवर पेरणी करणार आहे. कांद्याची तीन एकरांवर लागवड करणार आहे. त्यासाठी नांगरट करून ठेवली आहे.  मात्र पाऊस नसल्याने अजूनही पेरणी केलेली नाही.``
- प्रल्हाद वरे, शेतकरी, मळद, ता. बारामती.  

 

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहेत. पूर्वेकडील पट्ट्यात ढगाळ हवामान आहे. या भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा असून, खरीप पेरण्या खोळंबल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी केली होती. मात्र ऐन हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणेत यंदाही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली असल्याची स्थिती आहे. येत्या दहा ते बारा दिवसांत पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची शक्‍यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणी असतानाही बॅंकेकडून कर्ज घेऊन खरीप हंगामासाठी लागणाऱ्या निविष्ठांची खरेदी, नांगरणीची कामे केली. त्यामुळे पाऊस झाला असता, तर शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली असती, मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरल्याचे दिसून येते. अजूनही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची गरज आहे. दमदार पाऊस झाल्यास सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या पूर्वेकडील शिरूर, खेड, बारामती, इंदापूर, दौंड, हवेली तालुक्‍यांत पेरण्या होण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्‍यांत अनेक शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका टाकल्या आहेत. या भागात मधूनमधून पाऊस बरसत आहे. त्यामुळे रोपवाटिकांना जीवदान मिळत आहे. सध्या रोपवाटिकेतील भातरोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. परंतु येत्या दहा ते पंधरा दिवसांत या रोपांची पुनर्लागवड होण्याची गरज आहे. त्यासाठी जोरदार पाऊस अपेक्षित आहे. जोरदार पाऊस झाल्यास शेतात चिखलणी करून भात रोपांची वेळेवर लागवड होणार आहे. परंतु उशिराने पाऊस झाल्यास उशिरा लागवडीमुळे उत्पादनात घट येण्याची शक्‍यता आहे.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...