सातारा जिल्ह्यात रब्बीची ६० टक्के पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : जिल्ह्यात बुधवारअखेर (ता. १५) एकूण ५९.१९ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. परतीच्या दमदार पावसामुळे पेरणीस पोषक वातावरण निर्माण झाल्याने कामांना गती आली आहे. जिल्ह्यात रब्बी ज्वारीची सर्वाधिक एक लाख चार हजार ८९७ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १५ हजार १३५ हेक्‍टर असून, त्यापैकी एक लाख २७ हजार ३२८ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात माण तालुक्‍यात सर्वाधिक २४ हजार ३९० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

रब्बी ज्वारीची यंदा सर्वाधिक पेरणी झाली असून, ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३५ हजार ७४५ हेक्‍टर आहे. त्यापैकी एक लाख चार हजार ८९७ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

तसेच हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २९ हजार १७८ हेक्‍टर असून, त्यापैकी ११ हजार ६५७ हेक्‍टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र सात हजार ८३५ हेक्‍टर असून, तीन हजार १६३ हेक्‍टर क्षेत्रावर मक्‍याची लागवड झाली आहे.

गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३८ हजार ३९७ हेक्‍टर असून, त्यापैकी सात हजार ३५३ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. डिसेंबरच्या सुरवातीपासून गहू पेरणीस वेग येणार आहे. चालू हंगामाच्या उसाची लागवड सुरू असून, जिल्ह्यात आठ हजार १२५ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com