agriculture news in marathi, Sowing of rabi jowar on one lakh hectare | Agrowon

रब्बीची ज्वारीची एक लाख हेक्टरवर पेरणी
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 डिसेंबर 2018

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामात अन्नधान्यासह चारा म्हणून उपयोगी ठरणाऱ्या रब्बी ज्वारीची एक लाख ९ हजार ८५६ हेक्टरवर लागवड झाली आहे. जिल्ह्यात बुधवारअखेर (ता. १२) ७३.९९ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली. त्यात माण तालुका सर्वा पुढे आहे.   

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामात अन्नधान्यासह चारा म्हणून उपयोगी ठरणाऱ्या रब्बी ज्वारीची एक लाख ९ हजार ८५६ हेक्टरवर लागवड झाली आहे. जिल्ह्यात बुधवारअखेर (ता. १२) ७३.९९ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली. त्यात माण तालुका सर्वा पुढे आहे.   

जिल्ह्यात रब्बी पेरणीस वेग आला आहे. सध्या गहू, हरभरा मका पिकांची पेरण्या सुरू आहेत. जिल्ह्यात पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १४ हजार ८२३ हेक्‍टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) एक लाख ५८ हजार ९४४ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ७३.९९ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारीची यंदा सर्वाधिक पेरणी झाली आहे. तिचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३९ हजार १११ हेक्‍टर असून, त्यापैकी एक लाख नऊ हजार ८५६ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

थंडीत वाढ होऊ लागल्याने हरभरा, गहू पिकांच्या पेरणीस वेग आला आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८८३ हेक्‍टर असून, त्यापैकी २० हजार ३९७ हेक्‍टर क्षेत्रावर, गहू पिकांचे ३४ हजार ४७३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून त्याची १९ हजार ४७८ हेक्टर क्षेत्रावर, तर मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ९४१ हेक्‍टर असून, त्याची आठ हजार ५०८ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. रब्बी ज्वारीचा लागवड कालावधी संपत आला असल्याने उद्दिष्टे पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. हरभऱ्यांच्या हमीभावात वाढ केल्याने त्याच्याकडे कल वाढत आहे. पाणीटंचाई भीषण होऊ लागल्याने चारा पिके घेण्याकडे कल वाढला असल्याने मक्याची लागवड जास्त होण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात माण तालुक्यात सर्वाधिक दुष्काळाच्या झळा आहेत. या तालुक्याचा तीव्र दुष्काळ यादीत समावेश आहे. मात्र, या ठिकाणी सर्वाधिक पेरण्या झाल्या आहेत. पाणीटंचाईमुळे पिके वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार 
आहे.

 

इतर बातम्या
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...