नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध पिकांच्या १ लाख २७ हजार ९७१ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. त्यापैकी ४९ हजार ९०८ क्विंटल बियाण्यांची, तर कपाशीच्या ३ लाख ८८ हजार ८७ पाकिटांची विक्री झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. पुरेशा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. परिणामी, बियाणे खरेदी विक्रीचे व्यवहार मंदावल्याचे चित्र आहे.

यंदाच्या खरीप हंगामात महाबीजकडून ३३ हजार ९७५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला. त्यामध्ये सोयाबीन ३२ हजार २६१ क्विंटल, तूर २६९ क्विंटल, उडिद ५०६ क्विंटल, मूग ६७ क्विंटल, ज्वारी ८७२ क्विंटल आहे. खासगी बियाणे उत्पादक कंपन्याकडून ९३ हजार ९९६ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. त्यामध्ये सोयाबीन ८५ हजार २९६ क्विंटल, तूर ३ हजार क्विंटल, उडिद १ हजार क्विंटल, मूग १ हजार २०० क्विंटल, ज्वारी ३ हजार ५०० क्विंटल आहे.

आजवर जिल्ह्यात महाबीज आणि खासगी कंपन्यांचे मिळून सोयाबीनचे १ लाख १७ हजार ५५७ क्विंटल, तुरीचे ३ हजार २६९ क्विंटल, उडदाचे १ हजार ५०६ क्विंटल, मुगाचे १ हजार २६७ क्विंटल, ज्वारीचे ४ हजार ३७२ क्विंटल असे एकूण १ लाख २७ हजार ९७१ क्विंटल बियाणे प्राप्त झाले. कपाशीच्या बियाण्यांची खासगी कंपन्यांची ८ लाख ९५ हजार पाकिटे, महाबीजची ७ हजार ५२८ पाकिटे अशी एकूण ९ लाख २ हजार ५२८ पाकिटे मिळाली.

विक्री झालेल्या बियाण्यांत सोयाबीनचे ४५ हजार ८४७.२३ क्विंटल, तुरीचे १ हजार २७४.९१, उडदाचे ५८७.३४, मुगाचे ४९४.१३, ज्वारीचे १ हजार ७०५.०८ क्विंटल अशा एकूण ४९ हजार ९०८.६९ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. कपाशीच्या बियाण्यांच्या ३ लाख ८८ हजार ८७ पाकिटांची विक्री झाली. पावसाचे आगमन लांबल्यामुळे बहुतांश भागात पेरण्या ठप्प आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com