agriculture news in marathi, Sowing of Rs. 300 Growth | Agrowon

पेरणीच्या दरात तीनशे रुपयांनी वाढ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 जून 2018

शहा (सकाळ वृत्तसेवा) : सिन्नरच्या पूर्व भागात खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे. पावसाच्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जमिनीत वाफसा झाल्याने अख्खा शेतशिवार पेरणीसाठी गजबजला आहे. मोजक्‍याच शेतकऱ्यांकडे बैलजोडी असल्याने तुरळक ठिकाणीच बैलांच्या सहाय्याने पेरणी पाहावयास मिळत आहे. यंदा पेरणीच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे.

शहा (सकाळ वृत्तसेवा) : सिन्नरच्या पूर्व भागात खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे. पावसाच्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जमिनीत वाफसा झाल्याने अख्खा शेतशिवार पेरणीसाठी गजबजला आहे. मोजक्‍याच शेतकऱ्यांकडे बैलजोडी असल्याने तुरळक ठिकाणीच बैलांच्या सहाय्याने पेरणी पाहावयास मिळत आहे. यंदा पेरणीच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे.

ट्रॅक्‍टरद्वारे पेरणीला शेतकऱ्यांची अधिक मागणी आहे. पूर्व भागातील शहा, भरतपूर, झापेवाडी, उजणी, मिठसागरे, पाथरे, वारेगाव, पंचाळे, सायाळे, धारणगाव, फर्दापूर आदी ठिकाणी पेरणीची लगबग सुरू आहे. विहीर, तसेच बंधाऱ्याच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नसली तरी पावसाच्या ओलीवर पेरणी जुगार खेळला जात आहे. येत्या दोन-चार दिवसांत पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक पेरणी होण्याचा अंदाज आहे. पेरणीची एकच लगीनघाई सर्वत्र असल्याने साहजिकच ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने केली जाणारी पेरणीदेखील महागली आहे.

रणीच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत दोनश ते तीनशे रुपयांनी वाढ झाली असून, एकरी पेरणीसाठी एक हजार १०० ते एक हजार २०० रुपये खर्च येत आहे. मागील वर्षीचा पेरणीचा दर एकरी ९०० रुपये होता. डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे पेरणीचे दर वाढले आहे. जमिनीत पुरेशी ओल असल्याने निदान पेरणीनंतर पंधरा दिवस तरी पिके तग धरणार आहेत.

मका, सोयाबीनवर विशेष भर
खरीप पेरणीत बाजरी, तूर, मठ, मूग या पिकांकडे पाठ फिरविल्याने सोयाबीन, मका पिकांवर विशेष भर दिला आहे. मक्‍याला या वर्षी मिळालेला भाव, तसेच सोयाबीन दीर्घकाळ टिकणारी असल्याने या पिकांची पेरणी सिन्नरच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याचे दिसून येत आहे.

इतर ताज्या घडामोडी
सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव    : काळी अळू...
खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार : पपई दरांमध्ये दर आठवड्याला...
जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर...कोल्हापूर/गडहिंग्लज : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर...
औरंगाबादेत खरबूज प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
विद्यापीठांपेक्षा शेतकरी संशोधनात...सांगली : सध्या विद्यापीठाच्या तंत्रज्ञानापेक्षा...
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...