agriculture news in marathi, sowing scarcity due to lack of rain, pune, maharashtra | Agrowon

पावसाअभावी पुणे जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जून 2018

यंदा चांगल्या पावसाचा अंदाज जाहीर झाला असल्याने मी दोन एकरांवर पेरणीचे नियोजन केले होते. खरिपाच्या तोंडावर पाऊस गायब झाला असल्याने अजूनही पेरणी केलेली नाही. येत्या महिनाअखेर पाऊस झाल्यास पेरणी करता येणार आहे.
- गीताराम कदम, न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे.

पुणे : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर पावसाने दांडी मारल्याने पुणे जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी द्विधा मनःस्थितीत असून पाऊस न झाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

यंदा जिल्ह्यात २ लाख ३० हजार हेक्‍टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाचा होता. त्यानुसार खते, बियाणे वाटपाचे नियोजन कृषी विभागाने केले होते. सध्या जिल्ह्यातील सर्व भागात निविष्ठांचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी असतानाही पीक कर्ज घेऊन शेतकरी हंगामाचे नियोजन करीत आहे.

पश्‍चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्‍यांत भात रोपवाटिकेची कामे सुरू आहेत. पूर्वेकडील पट्ट्यात खेड, शिरूर, दौंड, इंदापूर, पुरंदर, हवेली, बारामती तालुक्‍यात मशागतीची कामे अंतिम टप्यात असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात भाताव्यतिरिक्त सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांची सुमारे दीड लाखाहून अधिक हेक्‍टरवर पेरणी होण्याची शक्‍यता होती.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील काही भागांत पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्साहात पेरण्यांना सुरवात केली होती. परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने अनेक भागांत पेरण्या खोळंबल्याचे चित्र आहे. चालू वर्षी वेळेवर पाऊस झाला असता, तर खरिपाच्या पेरण्या वेगाने होण्याची शक्‍यता होती. मात्र पावसाअभावी पेरण्यांच्या गतीवर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षावर पाणी फेरल्याची स्थिती आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...