agriculture news in marathi, Sowing starts in Brahmannagar area of ​​the district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात पेरणी सुरू
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 जुलै 2018

ब्राह्मणगाव : येथील परिसरात पावसाने ओढ दिल्यानंतर शेतकरी चिंतातुर झाले होते. सर्वांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. आर्द्रा नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीला सुरवात केली आहे.

ब्राह्मणगाव : येथील परिसरात पावसाने ओढ दिल्यानंतर शेतकरी चिंतातुर झाले होते. सर्वांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. आर्द्रा नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीला सुरवात केली आहे.

मोठ्या उत्साहाने शेतकऱ्यांनी आता खरिपाच्या मका, बाजरी, भुईमूग आदी पिकांची पेरणी सुरू केली आहे. शेती करताना मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांचा कल यांत्रिकीकरणाकडे वाढू लागला आहे. बैलांच्या किमती सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडील पशुधनाची संख्या घटत आहे. यावर उपाय म्हणून ट्रॅक्‍टरने शेतीची मशागत व पेरणीची कामे करावी लागत आहेत.

जळगाव (निं.) परिसरात मशागती

जळगाव (निं.) ः गाव व परिसरात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली असली तरी पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांनी एकदा लवकर पेरणी करून मोकळे होऊ या, या हेतूने प्रेरित होऊन पेरणीपूर्व मशागत आटोपून पेरणीला सुरवात केली. बैलजोडीअभावी यंत्राचा वापर झाला. ट्रॅक्‍टरद्वारे पेरणीसाठी एकरला पंधराशे ते सोळाशे व बैलजोडीचा रोज बाराशे ते चौदाशे असा आहे. हा भाग कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. पावसाअभावी अद्याप कांदा रोप टाकलेले नाहीत. गेल्या वर्षी काही ठिकाणी मका बियाण्याला मोड आले होते. त्यामुळे कोणते बियाणे खरेदी करावे, ही विवंचना आहे.

खामखेडा परिसरात पेरण्यांना वेग
 खामखेडा ः खामखेडा परिसरात मागील आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. मृग नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.

इतर ताज्या घडामोडी
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...