पुणे विभागात उन्हाळी पिकांची २७५० हेक्‍टरवर पेरणी

भुईमुग लागवड
भुईमुग लागवड

पुणे ः रब्बी हंगामानंतर विभागात उन्हाळी हंगामातील पिकांची पेरणी सुरू झाली आहे. पुणे विभागात उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र २३ हजार ३०० हेक्‍टर असून, त्यापैकी आतापर्यंत दोन हजार ७५० हेक्‍टरवर म्हणजेच अकरा टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात प्रामुख्याने उन्हाळी बाजरी, मका, भुईमूग या पिकांचा समावेश असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

विभागात दरवर्षी उन्हाळ्यात चाराटंचाई भेडसावत असते. त्यामुळे हा अनुभव लक्षात घेत शेतकरी मोठ्या प्रमाणात चारा पिकांची पेरणी करण्याची शक्‍यता आहे. विभागात उन्हाळी मक्‍याची ८६०, बाजरीची ३५०, भुईमुगाची एक हजार ५४० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची काढणी चालू आहे. गहू दाणे भरण्याच्या अवस्थेत असून, कोरडवाहू क्षेत्रातील गव्हाची काढणी सुरू झालेली आहे. हरभरा पिकाची काढणी चालू आहे. जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामातील पूर्वमशागतीची कामे प्रगतिपथावर असून, उन्हाळी मका व भूईमूग पिकाच्या पेरणीस अल्प प्रमाणात सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील  पारनेर, कर्जत, जामखेड, नेवासा, राहुरी, कोपरगाव या तालुक्‍यांत पेरणी झालेली आहे.

पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी पिकाच्या काढणीस सुरवात झाली आहे. गहू दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभरा पिकाच्या काढणीस सुरवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामातील पूर्वमशागतीची कामे प्रगतिपथावर आहे. उन्हाळी बाजरी व भुईमूग या पिकांच्या पेरणीस अल्प प्रमाणात सुरवात झाली आहे. जिल्ह्यात हवेली, भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौड या तालुक्‍यांत पेरणी सुरू झालेली आहे. 

सोलापूरमध्ये रब्बी हंगामातील ज्वारी, गहू व हरभरा पिकांची काढणी सुरू आहे. उन्हाळी हंगामातील पूर्व मशागतीची कामे प्रगतिपथावर असून, उन्हाळी मका व भुईमूग पिकांची पेरणी सुरू झाली आहे. उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा तालुक्‍यांत पेरण्यांना प्रारंभ झाला आहे.

जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र    टक्के
नगर  ८४००   ३४०
पुणे ६४६०  ८४० १३
सोलापूर ८४४० १५७० १८
एकूण २३,३००   २७५० ११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com