पुणे विभागात उन्हाळी पिकांची ९४३० हेक्‍टरवर पेरणी

भुईमुग लागवड
भुईमुग लागवड

पुणे  ः विभागात उन्हाळी हंगामातील पिकांच्या पेरण्या सुरू आहेत. विभागात उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र २३ हजार ३०० हेक्‍टर असून, त्यापैकी ९४३० हेक्‍टरवर म्हणजेच ४० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यात प्रामुख्याने उन्हाळी बाजरी, मका, भुईमूग या पिकांचा समावेश असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

मागील काही वर्षांपासून उन्हाळ्यात चाराटंचाईचा मोठा प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चारा पीक लागवडीकडे वळू लागले आहे. परिणामी विभागात उन्हाळी पिकाच्या क्षेत्रात घट होत असल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. यामुळे स्रोतांमधील पाणीपातळीत बऱ्यापैकी वाढ झाली. त्यामुळे उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता आहे.
 
उन्हाळी मक्‍याची २५२०, बाजरीची २५५०, उन्हाळी मुगाची १०, भुईमुगाची ४३५० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.  विभागातील नगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी पूर्ण होत आली आहे. गहू व हरभऱ्याची काढणी सुरू आहे. उन्हाळी हंगामातील मका व भुईमुगाच्या पेरणीस सुरवात झाली असून, पेरणी झालेली पिके वाढीच्या अवस्थेत आहे. नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नेवासा, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर या तालुक्‍यांत उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. 
 
पुणे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी पूर्णत्वास आली आहे. गहू, हरभरा पिकाची काढणी सुरू आहे. उन्हाळी हंगामातील बाजरी व भुईमुगाच्या पेरणीस सुरवात झाली आहे. काही ठिकाणी बाजरी, भुईमूग पीक वाढीच्या अवस्थेत आहे. हवेली, भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्‍यांत उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.  
 
सोलापूरमध्ये रब्बी ज्वारीची काढणी पूर्णत्वास आली आहे. गहू व हरभऱ्याची काढणी चालू आहे. जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील मका व भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा तालुक्‍यांत काही प्रमाणात उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. 
 
जिल्हानिहाय झालेल्‍या पेरण्या ः (हेक्‍टर)
जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्के
नगर ८४०० ११७० १३ 
पुणे ६४६० ५२३० ८१ 
सोलापूर ८४४० ३०३० ३५ 
एकूण २३,३०० ९४३० ४०

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com