agriculture news in marathi, sowing status of summer crops in pune region, maharashtra | Agrowon

पुणे विभागात उन्हाळी पिकांची ७१ टक्के पेरणी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 एप्रिल 2018
पुणे  ः पुणे विभागात सरासरी २३ हजार ३०० हेक्‍टर क्षेत्रापैकी १६ हजार ६०० हेक्‍टरवर म्हणजेच ७१ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. मका, भुईमूग, बाजरी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा या पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. उशिराने पेरलेल्या गहू पिकाची काढणी सुरू आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
 
पुणे  ः पुणे विभागात सरासरी २३ हजार ३०० हेक्‍टर क्षेत्रापैकी १६ हजार ६०० हेक्‍टरवर म्हणजेच ७१ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. मका, भुईमूग, बाजरी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा या पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. उशिराने पेरलेल्या गहू पिकाची काढणी सुरू आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
 
पुणे विभागात उन्हाळी मक्‍याचे सरासरी ४४४० हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत चार हजार ४० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. उन्हाळी बाजरीची ४१७० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. भुईमुगाचे सरासरी क्षेत्र १७ हजार ८०० हेक्‍टर असून, त्यापैकी आतापर्यंत ८३७० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. उन्हाळी मुगाची वीस हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. 
 
नगर जिल्ह्यात नेवासा, श्रीगोंदा तालुक्‍यात उन्हाळी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, अकोले, जामखेड तालुक्‍यांत मका, भुईमूग या पिकांची बऱ्यापैकी पेरणी झाली आहे. शेवगाव, पाथर्डी तालुक्‍यांत उन्हाळीची पेरणी झालेली नाही. 
 
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, बारामती तालुक्‍यांत उन्हाळी पिकांची पेरणी चांगल्या प्रमाणात झाली आहे. पुरंदर, शिरूर, दौंड, हवेली, भोर, इंदापूर तालुक्‍यांत पेरणीचे प्रमाण अत्यल्प आहे. मावळ, वेल्हे, मुळशी तालुक्‍यांत उन्हाळी पिकांची पेरणी झालेली नाही. 
 
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा तालुक्‍यांत बऱ्यापैकी क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, सांगोला तालुक्‍यांत पेरणीचे प्रमाण अत्यल्प आहे. 
 
जिल्हानिहाय झालेली उन्हाळी पेरणी ः (हेक्‍टरमध्ये)
जिल्हा सरासरी क्षेत्र झालेली पेरणी टक्के 
नगर ८४०० ५३२० ६३
पुणे ६४६० ८२५० १२७
सोलापूर ८४४० ३०३० ३५

 

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...