agriculture news in Marathi, Sowing of summer jowar on half acre hectare in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर उन्हाळी ज्वारी पेरणी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत २ हजार ६९४ हेक्टरवर (४३. १७) उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. यंदा उन्हाळी ज्वारीसह तृणधान्याचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, भुईमूग, सूर्यफूल या गळितधान्याच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे.

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत २ हजार ६९४ हेक्टरवर (४३. १७) उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. यंदा उन्हाळी ज्वारीसह तृणधान्याचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, भुईमूग, सूर्यफूल या गळितधान्याच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे.

यंदा जिल्ह्यात उद्भभवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे चारा तसेच अन्नधान्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीच्या पेरणीला पसंती दिली आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार १५१ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. चाऱ्यासाठी मका पिकांची ४८१ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सध्याच्या एकूण उन्हाळी पेरणी क्षेत्रापैकी ६० टक्के क्षेत्रावर चारा पिकांची पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात यंदा ज्वारी, मका, भात (तांदूळ) या उन्हाळी तृणधान्याची मिळून एकूण १ हजार ७३१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. भूईमुगाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. भूईमुगाचे सर्वसाधारण क्षेत्र ४ हजार ८६० हेक्टर असताना यंदा केवळ ५९४ (१२.१२) टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सूर्यफुलाचे सर्वसाधारण क्षेत्र १ हजार ३०० हेक्टर असतांना केवळ २८ हेक्टरवर (२.१५ टक्के) पेरणी झाली आहे. उन्हाळी तीळाचे क्षेत्र वाढले असून एकूण ३४१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

गळितधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६ हजार १६० हेक्टर असताना प्रत्यक्षात ९६३ हेक्टरवर (१५.६३ टक्के) पेरणी झाली आहे. तालुकानिहाय पेरणी क्षेत्र विचारात घेतले असता यंदा किनवट, नायगांव, लोहा या तीन तालुक्यांत उन्हाळी पिकांची पेरणी वाढली. किनवट तालुक्यात सर्वाधिक १ हजार ४३० हेक्टरवर म्हणजेच जिल्ह्यातील एकूण पेरणी क्षेत्राच्या ५३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अर्धापूर, मुदखेड, कंधार, माहूर या चार तालुक्यांतील उन्हाळी पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. नांदेड, देगलूर, मुखेड, बिलोली, धर्माबाद, हदगांव, हिमायनगर, उमरी या आठ तालुक्यांतील उन्हाळी पेरणी अद्याप क्षेत्र निरंक आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
नाशिकमध्ये वांगी ३००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
दोषी कंपनीलाच शासनाचे १५ कोटींचे...मुंबई : केंद्र सरकारच्या ‘आयएलएफएस’ या...