agriculture news in marathi, Sowing of three lakh hectare in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 जून 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७ हजार ३१६ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. अपेक्षित पेरणी ४९ लाख १० हजार ९१४ हेक्‍टरवर असल्याने काही जिल्ह्यांत व संपूर्ण मराठवाड्यातील प्रस्तावित खरीप क्षेत्राच्या तुलनेत ही पेरणी नगण्य अाहे. त्यामुळे पेरणीचा टक्‍का पावसाच्या अनियमिततेची प्रचिती देतो आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७ हजार ३१६ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. अपेक्षित पेरणी ४९ लाख १० हजार ९१४ हेक्‍टरवर असल्याने काही जिल्ह्यांत व संपूर्ण मराठवाड्यातील प्रस्तावित खरीप क्षेत्राच्या तुलनेत ही पेरणी नगण्य अाहे. त्यामुळे पेरणीचा टक्‍का पावसाच्या अनियमिततेची प्रचिती देतो आहे.

औरंगाबाद कृषी विभागांतर्गत येत असलेल्या औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत २८४८० हेक्‍टरवर अाहे. तर लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांत ३ लाख ३८ हजार ८३६ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. यंदा कृषीच्या औरंगाबाद विभागात खरिपाची पेरणी १९ लाख ९२ हजार ३२१ हेक्‍टरवर, तर लातूर कृषी विभागात २९ लाख १८ हजार ५५३ हेक्‍टरवर प्रस्तावित करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्हा
औरंगाबाद जिल्ह्यात यंदा खरिपात ७ लाख ३ हजार ६४२ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी होणे अपेक्षित आहे. अपेक्षित पेरणीक्षेत्राच्या तुलनेत केवळ १.०२ टक्‍के म्हणजे ७१८२ हेक्‍टर क्षेत्रावरच खरिपाची पेरणी झाली आहे. त्यामध्ये मकाची ३५९ हेक्‍टरवर, तूर ५५ हेक्‍टरवर, मूग ४० हेक्‍टरवर, तर कपाशीची ४९०५ हेक्‍टरवर लागवड झाली आहे. जिल्ह्यात यंदा कपाशीची ३ लाख ८७ हजार ३५४ हेक्‍टरवर लागवड होणे अपेक्षित आहे.

जालना जिल्हा
जालना जिल्ह्यात यंदा खरिपात ५ लाख ७९ हजार ३१० हेक्‍टरवर खरिपाची पेरणी होणे अपेक्षित आहे. त्या तुलनेत खरिपाची २.०२ टक्‍के अर्थात ११ हजार ७२१ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यामध्ये मका ७६ हेक्‍टर, तूर ८९६ हेक्‍टर, मूग १९२ हेक्‍टर, उडीद ५१ हेक्‍टर, सोयाबीनची २४७ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात कपाशीची २ लाख ९७ हजार ९९२ हेक्‍टर प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत ९ हजार ४७३ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे.

बीड जिल्हा
बीड जिल्ह्यात यंदा खरिपाचे क्षेत्र ७ लाख ९ हजार ३६९ हेक्‍टरवर प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत ९५७७ हेक्‍टरवरील खरिपाची पेरणी आटोपली आहे. अपेक्षित क्षेत्राच्या तुलनेत पेरणीचा टक्‍का १.३५ टक्‍केच आहे. पेरणी वा लागवड झालेल्या पिकांमध्ये खरीप ज्वारीची १०४ हेक्‍टरवर, बाजरी ७ हेक्‍टर, मकाची १०७ हेक्‍टर, तूर २३३ हेक्‍टर, मूग १५७ हेक्‍टर, उडीद ३२ हेक्‍टर, सोयाबीन ३५८३ हेक्‍टरवर, तर कपाशीची ५२७३ हेक्‍टरवर लागवड झाली आहे. यंदा बीड जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र ३ लाख २९ हजार ३२१ हेक्‍टरवर प्रस्तावित करण्यात आले आहे.

लातूर जिल्हा
लातूर जिल्ह्यात यंदा ६ लाख ३ हजार ८४८ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रस्तावित क्षेत्रापैकी ३६ हजार ९१५ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात कपाशीची ८१ हेक्‍टरवर लागवड झाली आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...