गव्हाची ६५ हजार ५४३ हेक्टरवर पेरणी

गव्हाची ६५ हजार ५४३ हेक्टरवर पेरणी
गव्हाची ६५ हजार ५४३ हेक्टरवर पेरणी

नांदेड :नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा ६५ हजार ५४३ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली. नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील गव्हाचे पेरणी क्षेत्र कमी झाले आहे. परंतु, परभणी जिल्ह्यातील गव्हाचे क्षेत्र वाढले आहे. या तीन जिल्ह्यांत गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३ हजार ८३० हेक्टर आहे. तसेच एकूण ६५ हजार ५४३ हेक्टरवर (६३.१२ टक्के) गव्हाची पेरणी झाल्याची माहिती आहे.

नांदेड जिल्ह्यात गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३८ हजार ५३८ हेक्टर आहे. यंदा अनेक तालुक्यामध्ये गंभीर दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे गव्हाच्या क्षेत्रात घट झाली. इसापूर धरणाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील अर्धापूर, हदगांव, मुदखेड, नांदेड तालुक्यांत सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना गव्हाची पेरणी करता आली.

परभणी जिल्ह्यात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाणी आवर्तनामुळे लाभक्षेत्रातील पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा या तालुक्यांत, तसेच करपरा मध्यम प्रकल्पाच्या कालव्याच्या पाणी आवर्तनामुळे जिंतूर तालुक्यात गव्हाचे क्षेत्र वाढले. सेलू तालुक्यातही गव्हाचे क्षेत्र आहे. या जिल्ह्यात गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र २० हजार ८२२ हेक्टर आहे. परंतु, यंदा २३ हजार ६४३ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली.

हिंगोली जिल्ह्यात गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ४४ हजार ४७० हेक्टर आहे. सिद्धेश्वर धरणाच्या कालव्याचे पाणी आवर्तन न मिळाल्यामुळे गव्हाच्या क्षेत्रात घट झाली. इसापूर कालव्याच्या लाभक्षेत्रात गव्हाची पेरणी झाली. यंदा २१ हजार ७०७ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com