agriculture news in marathi, Soya bean crumbled in Buldana | Agrowon

बुलडाण्यात सोयाबीनला खोडकिडीने पोखरले
टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

बुलडाणा : जिल्ह्यात विविध भागांत सोयाबीनच्या पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकरी चिंतातूर झाले अाहेत. खोडकिड्यासह करपा आल्याने सोयाबीन पिकाच्या फूल, शेंगा करपून काळ्या पडू लागल्या अाहेत. यामुळे ठिकठिकाणी सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे.

बुलडाणा : जिल्ह्यात विविध भागांत सोयाबीनच्या पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकरी चिंतातूर झाले अाहेत. खोडकिड्यासह करपा आल्याने सोयाबीन पिकाच्या फूल, शेंगा करपून काळ्या पडू लागल्या अाहेत. यामुळे ठिकठिकाणी सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे.

संग्रामपूर तालुक्यात सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेल्या सोयाबीनवर खोडकीड वाढली अाहे. त्यामुळे झाडांची वाढ थांबणे, शेंगा सुकणे, दाणे न भरणे, असा फटका बसत आहे. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा अाघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी डी. बी. सवडतकर यांनी शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी पिकावर प्रचंड प्रमाणात खोड कीड आल्याचे दिसून आले.
याबाबत अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उपाययोजनेसंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले.

यावेळी कृषी अधिकारी सी. पी. उंदरे, कृषी मंडळ अधिकारी जी. डी. नांगे, कृषी सहायक एम. डी मोहीते, बी. एम असंबे, एम बी. निकम, तसेच स्वाभिमानीचे रोशन देशमुख, आशिष नांदोकार, नंदकिशोर बोडखे, पुरुषोत्तम भुते, गणेश डाबरे, वासुदेव ढगे, रुपेश ढगे, दिनेश टाकळकर, संतोष घायल, गजानन अस्वार, तुकाराम रौंदळे, योगेश धुर्डे, गणेश डाबरे अादी शेतकरीही उपस्थित होते.

इतर बातम्या
कपाशीच्या नांदेड ४४ बीटी बियाण्याची ५...परभणी ः महाबीज आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
शेतीमालाच्या काढणीपश्चात तंत्रज्ञानावर...नाशिक :  ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
रायवाडी तलावातून १५ हजार ब्रास गाळ काढलासांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वाधिक पाणी...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
लातूर विभागात होणार चौदाशे शेतीशाळालातूर ः या वर्षीपासून शेतकऱ्यांच्या शेतावर...
कोरडवाहू फळपिकांच्या क्षेत्र वाढीसाठी...नांदेड ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शाश्वत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
पुणे विभागात राष्ट्रीय फलोत्पादन...पुणे   ः कृषी विभागामार्फत चालू वर्षी...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
परभणीत खरिपासाठी ९७ हजार क्विंटल...परभणी ः परभणी जिल्ह्यात २०१९-२० च्या खरीप...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...