मध्य प्रदेशात नवीन सोयाबीनची अावक सुरू
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली  ः सोयाबीन उत्पादनात अाघाडीवर असलेल्या मध्य प्रदेशात नवीन पिकाची अावक सुरू झाली अाहे. सध्या राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये अावक कमी होत अाहे. मात्र पुढील १५-२० दिवसांत सोयाबीनची अावक पूर्ण क्षमतेने सुरू होईल. यामुळे रोजची अावक १० हजार ते १५ हजार पिशव्यांपर्यंत पोचू शकते, असा अंदाज येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला अाहे.

इंदोर येथील बाजार समितीमध्ये सोयाबीन अावक सुरू झाली अाहे. नवीन सोयाबीनचा दर्जा समाधानकारक अाहे. मात्र नवीन सोयाबीन लहान अाकाराचा अाहे, अशी माहिती इंदोर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष एन. के. अगरवाल यांनी दिली.

नवी दिल्ली  ः सोयाबीन उत्पादनात अाघाडीवर असलेल्या मध्य प्रदेशात नवीन पिकाची अावक सुरू झाली अाहे. सध्या राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये अावक कमी होत अाहे. मात्र पुढील १५-२० दिवसांत सोयाबीनची अावक पूर्ण क्षमतेने सुरू होईल. यामुळे रोजची अावक १० हजार ते १५ हजार पिशव्यांपर्यंत पोचू शकते, असा अंदाज येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला अाहे.

इंदोर येथील बाजार समितीमध्ये सोयाबीन अावक सुरू झाली अाहे. नवीन सोयाबीनचा दर्जा समाधानकारक अाहे. मात्र नवीन सोयाबीन लहान अाकाराचा अाहे, अशी माहिती इंदोर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष एन. के. अगरवाल यांनी दिली.

इंदोर येथील बाजारात बुधवारी (ता. ६) २५-३० पिशव्या (एक पिशवी- १०० किलो) सोयाबीनचा लिलाव करण्यात अाला. त्याला प्रतिक्विंटल ३,६००-३,८०० रुपये दर मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ३,०००-३,५०० रुपये दर मिळाला होता. नवीन सोयाबीनमधील अार्द्रतेचे प्रमाण २०.२५ टक्के अाहे. सर्वसाधारणपणे अार्द्रतेचे प्रमाण १०-१२ टक्के एवढे असते, असेही ते म्हणाले.

मध्य प्रदेशातील सोयाबीन
क्षेत्रात सात टक्क्यांनी घट

पाऊस कमी झाल्यामुळे यंदा मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादन घटण्याची चिन्हे दिसत अाहेत. त्यात शेतकरी सोयाबीन पिकांकडून कापूस पिकाकडे वळले अाहेत. त्यामुळे सोयाबीन पीक क्षेत्र कमी झाले अाहे. कृषी मंत्रालयाकडील अाकडेवारीनुसार, यंदा राज्यात ५.०१ दशलक्ष हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली अाहे. गेल्या वर्षी ५.३६ दशलक्ष हेक्टरवर सोयाबीन पीक क्षेत्र होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लागवड क्षेत्रात ७ टक्क्यांनी घट झाली अाहे.

देशातील सोयाबीन उत्पादन घटणार
भारतातील सोयाबीन उत्पादनात यंदा (२०१७-१८) ५ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज अाहे. यंदा ९.६ दशलक्ष टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तविण्यात अाली अाहे.

मध्य प्रदेशातील सोयाबीन पीक क्षेत्र (दशलक्ष हेक्टरमध्ये)
२०१७-१८...५.०१
२०१६-१७...५.३६
स्राेत ः कृषी मंत्रालय

इतर ताज्या घडामोडी
शीतकरण केंद्र बंद असल्याने दुग्धोत्पादक...अमरावती : वाशीम येथील शासकीय दुग्ध योजनेकडून...
पुणे बाजार समिती असुविधांच्या विळख्यात पुणे : राज्यात सर्वांत माेठ्या बाजार...
नाशिकला टोमॅटो ४५५ ते १६३५ रुपये क्विंटलनाशिक : नाशिक, नगर जिल्ह्यातून वाढलेली आवक,...
साताऱ्यात वाटाणा, वांगी, गवार तेजीत सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
नागपूरमध्ये हरभरा सरासरी ५६४० रुपये...नागपूर ः कळमना बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून...
शेतकऱ्यांना न्याय मिळायवा हीच भूमिका :...अकोला : भारत हा कृषिप्रधान देश म्हटला जातो, मात्र...
साताऱ्यात दमदार पावसामुळे पाणीटंचाईची... सातारा : जिल्ह्यात गेल्या सप्ताहात झालेल्या...
‘सिद्धेश्‍वर’कडून गतहंगामातील उसाला... सोलापूर : दुष्काळ, कमी पाऊसमान यामुळे...
वऱ्हाडात मॉन्सूनपूर्व कपाशीचे नुकसान अकोला : गत आठवड्यात काही भागांत संततधार पाऊस...
गवारगमसह तांदूळ निर्यात वाढलीमुंबई ः अमेरिकेतून मागणी वाढल्याच्या...
उकाडा वाढलापुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने...
जळगावमध्ये नवती केळी १०२५ रुपये क्विंटल जळगाव ः मागील आठवड्याच्या सुरवातीला जिल्ह्यात...
सोलापुरात वांगी, कोबी, ढोबळी मिरचीच्या... सोलापूर ः येथील बाजार समितीच्या आवारात गत...
एक लाख हेक्टरने हरभऱ्याचा पेरा वाढणारपुणे : राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी...
राज्यात दुधाचा एकच ब्रॅँड बनविणार :...राहुरी, जि. नगर : गुजरातमधील ‘अमूल’प्रमाणेच...
जनताप्रश्नी सरकार अधिक संवेदनशील :...नवी दिल्ली ः ``जनतेच्या प्रश्नी सरकार अधिक...
पुणे विभागात रब्बीसाठी आठ लाख टन खताची...पुणे  ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून...
बुलेट-ट्रेनसाठी महाराष्ट्राला २५ हजार...नगर : मुंबई- अहमदाबाद बुलेट-ट्रेनऐवजी चंद्रपूर ते...
पावसाचा केळी, कापूस, मका, ज्वारीला फटका यावल, जि. जळगाव  : शहर व परिसरात या...
परभणीत गहू, हऱभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची... परभणी : येत्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यात २...