Agriculture News in Marathi, soyabean crop damaged by rain, Sangli | Agrowon

परतीच्या पावसाचा सोयाबीनला फटका
अभिजित डाके
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017
परतीच्या पावसाने काढणीला आलेले सोयाबीन कुजू लागले आहेत. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्‍यता आहे. आजही सोयाबीनच्या शेतात पाणी साचलेले आहे. यामुळे सोयाबीन काढणीला व्यत्यय येत आहे.
- शरद पवार, सोयाबीन उत्पादक शेतकरी, अहिरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.
सांगली ः जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला.
 
काढणीस आलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणी साचून सोयाबीन कूजू लागली आहेत. यामुळे उत्पादनातही घट होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.
 
जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे ४७ हजार ३८५ हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. पाऊस कमी झाल्याने पेरणी कमी झाली होती. मात्र, झालेल्या पावसावर सोयाबीनची पिके चांगली बहरली होती. सोयाबीन पिकाच्या काढणीसाठी शेतकऱ्यांनी नियोजन सुरू केले होते. मात्र, जिल्ह्यातील वाळवा, पलूस, मिरज तालुक्‍यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी दमदार पाऊस झाला.
 
या पावसाने ऊस पिकाला जीवदान मिळाले असले तरी सोयाबीन पिकाला याचा फटका बसला आहे. सोयाबीन काढणीच्या वेळेसच पावसाने हजेरी लावली. यामुळे सोयाबीनची काढणी काहीशी पुढे गेली आहे. सोयाबीनची काढणी सुरू असली तरी शेतात पाणी साचून राहिलेले आहे. यामुळे सोयाबीन कुजू लागले आहे.
 
परिणामी सोयाबीन काढणीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या शेतातील पाणी काढण्याचे काम शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. साचलेल्या पाण्यात सोयाबीनची काढणी सुरू आहे.
 
 

इतर ताज्या घडामोडी
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...