agriculture news in marathi, Soyabean crops becomes major in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात सोयाबीन क्षेत्राला भरती; अन्नधान्य पिकांना आेहोटी
संतोष मुंढे
शनिवार, 19 मे 2018
  • वीस वर्षांत सर्वसाधारण खरीप क्षेत्रात १८ लाख हेक्‍टरने वाढ
  • सरासरी क्षेत्राच्या तुलनेत कपाशीचे क्षेत्र जैसे थे

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या क्षेत्रात १९९७-९८ ते २०१७-१८  या वीस वर्षांत १८ लाख २१ हजार हेक्‍टरने वाढ झाली. यात सोयाबीन क्षेत्रात ३६ टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून ज्वारी, बाजरी आदी अन्नधान्यांच्या पीकक्षेत्रात मात्र घट नोंदली गेली आहे. कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्ष पेरणी होणाऱ्या क्षेत्राचा टक्‍का मात्र कायम राहिला आहे. 

साधारणत: वीस वर्षांपूर्वी म्हणजे १९९७-९८ मध्ये मराठवाड्यात भात, मका, ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी आदी पिकं घेतली जायची. त्या वेळी मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३० लाख ९० हजार हेक्‍टर होते. १९९७-९८ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये वीस वर्षांच्या कालावधीत मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र १८ लाख २१ हजार हेक्‍टरने वाढून ४९ लाख ११ हजार हेक्‍टरवर पोचले.खरिपाचा क्षेत्रविस्तार झाला असताना पिकात कोणताही बदल झाला नाही. परंतु, त्या पिकांच्या क्षेत्रात मात्र घट वाढ नोंदली गेली आहे. ज्वारीचे क्षेत्र २६ टक्‍क्‍यांवरून ३ टक्‍क्‍यांवर, तर भाताचे क्षेत्र ३ टक्‍क्‍यांवरून ०.१५ टक्‍क्‍यांवर व बाजरीचे क्षेत्र १४ टक्‍क्‍यांवरून ३ टक्‍क्‍यांवर आले आहे. वीस वर्षात अन्नधान्यांची पीक ४० टक्‍क्‍यांवरून ६ टक्‍क्‍यांपर्यंत घटली. 

कपाशीचे क्षेत्र मात्र सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत जैसे थे म्हणजे ३४ टक्‍केच राहिले आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. १९९७-९८ मध्ये सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ एक टक्‍का असलेले सोयाबीनचे क्षेत्र ३६ टक्‍क्‍यांनी वाढून आता ३७ टक्‍क्‍यांवर पोचले आहे. 
 

पीक क्षेत्र १९९७-९८ क्षेत्र २०१७-१८
ज्वारी ७ लाख ९९ हजार हेक्‍टर १ लाख ५५ हजार हेक्‍टर
बाजरी ४ लाख २७ हजार हेक्‍टर १ लाख ३६ हजार हेक्‍टर
सोयाबीन ३१ हजार हेक्‍टर १७ लाख २५ हजार हेक्‍टर
मका १ लाख ९९ हजार हेक्‍टर २ लाख ७९ हजार हेक्‍टर
कापूस १० लाख ७२ हजार हेक्‍टर १५ लाख ९२ हजार हेक्‍टर
भात ८९ हजार हेक्‍टर ०७ हजार हेक्‍टर
तूर, मूग, उडीद इ. पिकं  ५ लाख ०५ हजार हेक्‍टर ८ लाख ३२ हजार हेक्‍टर
(स्त्रोत : कृषी विभाग)    
२००७-२००८ ते २०१७-१८ दरम्यान खरीप पिकातील घट वाढ (क्षेत्र हेक्‍टरमध्ये)
पीक २००७-२००८  २०१७-१८ 
कापूस १२ लाख ४८ हजार  १५ लाख ९२ हजार
सोयाबीन ६ लाख ६२ हजार १७ लाख २५ हजार
तूर, मूग, उडीद इ ९लाख ८२ हजार ८ लाख ३२ हजार
मका १ लाख ९२ हजार  २ लाख ७९ हजार
बाजरी ३ लाख ५८ हजार १ लाख ३६ हजार
ज्वारी ५ लाख ५५ हजार १ लाख ५५ हजार
भात ५६ हजार ०७ हजार हेक्‍टर

अलीकडच्या दहा वर्षांतील खरीप पीक बदलाचे चित्र (२००७-२००८ ते २०१७-१८)

  • अलीकडच्या दहा वर्षांत सोयाबीनचे क्षेत्र दुपटीपेक्षा जास्त वाढले
  •  कडधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र २४ टक्‍क्‍यांवरून १८ टक्‍क्‍यांवर आले
  •  कपाशीच्या क्षेत्रात तीन टक्क्‍यांची वाढ
  • अन्नधान्यांचे क्षेत्र २५ टक्‍क्‍यांवरून ६ टक्‍क्‍यांपर्यंत घटले
  • तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या क्षेत्रात सहा टक्‍क्‍यांची घट
     

इतर अॅग्रो विशेष
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...
आजचा चंद्र हा सर्वांत जवळ : 'ग्रेट...या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या...
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...