agriculture news in marathi, soyabean decline to 1825 rupees per quintal in ner, Yavatmal, Maharashtra | Agrowon

सोयाबीनला अवघा १८२५ रुपयांचा भाव
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

नेर, यवतमाळ ः व्यापाऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची अवघ्या १८२५ रुपये प्रतिक्‍विंटलने खरेदी केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नेर बाजार समितीसमोर तीव्र आंदोलन केले. सोमवारी (ता. २३) अमरावती- यवतमाळ मार्गावर झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी टायर जाळल्याने वाहतूक बराचवेळ प्रभावित झाली होती. 

नेर, यवतमाळ ः व्यापाऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची अवघ्या १८२५ रुपये प्रतिक्‍विंटलने खरेदी केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नेर बाजार समितीसमोर तीव्र आंदोलन केले. सोमवारी (ता. २३) अमरावती- यवतमाळ मार्गावर झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी टायर जाळल्याने वाहतूक बराचवेळ प्रभावित झाली होती. 

सोयाबीनला उठाव नसल्याचे कारण सांगत व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदीचा सपाटा लावला आहे. सद्यःस्थितीत २३०० ते २७०० रुपये प्रतिक्‍विंटलने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. नेर बाजार समितीत सोमवारी भटकर व ठाकरे या शेतकऱ्यांनी सात क्‍विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. बाजार समितीमधील अडत्याकडे टाकल्यानंतर या मालाची खरेदी अवघ्या १८२५ रुपयांनी झाली. तशी सौदापट्टी देखील करण्यात आली.

बाजार समितीत अशाप्रकारे मातीमोल भावाने सोयाबीन विकले जात असल्याचे पाहून संयमाचा पारा सुटलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक होत अमरावती- यवतमाळ मार्गावर रास्ता रोको केले. युवा शेतकरी संघटनेचे गोपाल चव्हाण हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले. रस्त्याने जात असलेल्या देवानंद पवार व माजी आमदार विजयाताई धोटे यांनीदेखील या आंदोलनात सहभाग घेतला. 

तहसीलदारांनी केली मध्यस्थी
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार अमोल पोवार घटनास्थळी पोचले. शासकीय खरेदी केंद्र मंगळवारी (ता. २४) सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना या वेळी दिली. त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष कमी झाल्याने तब्बल तासभरानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

इतर बातम्या
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...