agriculture news in marathi, soyabean declines below msp | Agrowon

सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक काहीशी वाढली आहे. पण, त्याचे दर मात्र २४०० रुपये प्रतिक्विंटलपासून ते २६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. आवकेत जशी वाढ होत आहे, तसे दर पाडले जात असल्याचा प्रकार घडत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. 

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक काहीशी वाढली आहे. पण, त्याचे दर मात्र २४०० रुपये प्रतिक्विंटलपासून ते २६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. आवकेत जशी वाढ होत आहे, तसे दर पाडले जात असल्याचा प्रकार घडत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. 

बाजार समितीमध्ये उडीद, मूग, सोयाबीन खरेदी केंद्र मागील आठवड्यात सुरू झाले. परंतु, या केंद्रात कमी दर्जाचा, ओला माल (नॉन एफएक्‍यू) असल्याचे सांगून शेतकऱ्यांना परतावून लावले जात आहे. शेतकरी जो माल आणतात तो घरी नेण्यासाठी पुन्हा वाहतूक खर्च लागेल, नुकसान होईल, यामुळे तो बाजार समितीत व्यापाऱ्याकडे नेतात. पण व्यापाऱ्यांकडे कमाल २६०० रुपये प्रतिक्विंटल दर आहेत. 

शासनाने सोयाबीनला ३०५० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केलेला असला, तरी हमीभावापेक्षा कमी दरामध्ये सर्रास सोयाबीनची खरेदी बाजार समितीमध्ये केली जात आहे. कमी दर्जाचा माल म्हणून एवढी लुटालूट सुरू असल्याने शेतकरीही अडचणीत आले आहेत; पण याकडे लक्ष द्यायला कुणी तयार दिसत नाही. 

सोयाबीन काढणीला दिवाळीनंतर वेग आला. आजघडीला सर्वत्र सोयाबीनची काढणी जवळपास पूर्ण झालेली दिसत आहे. जिल्हाभरात २९ हजार हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. उत्पादन दोन क्विंटल प्रतिएकरपासून चार क्विंटलपर्यंत आले आहे. उत्पादन हवे तसे नसतानाच दरांबाबत समाधानकारक स्थिती नसल्याने दुहेरी फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. बाजार समितीमध्ये मागील महिन्यात प्रतिदिन ७०० क्विंटल सोयाबीनची आवक होत होती. आता ती वाढली आहे. पुढील काळात आणखी मध्य प्रदेशातील सोयाबीन यायला सुरवात होईल, त्यामुळे दर आणखी पाडले जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...