agriculture news in marathi, Soyabean harvesting fast in Khandesh | Agrowon

खानदेशात सोयाबीन मळणीला वेग
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

जळगाव : खानदेशात सोयाबीनची मळणी वेगात सुरू आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. अनेक भागात कापणी पूर्ण झाली आहे. परंतु मळणी राहिली आहे. मळणी लवकर उरकून धान्य घरात आणण्याची लगबग शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

सोयाबीनची पेरणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर, धुळे भागात झाली होती. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा व शहादा भागात सोयाबीनचे पीक अधिक होते. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा भागात पेरणी अधिक झाली होती. परंतु मागील दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सर्वत्र सोयाबीन कापणी किंवा मळणीच्या अवस्थेत आहे. जळगाव, चोपडा, शहादा भागात कापणी संपत आली आहे.

मळणीसाठी पंजाब, हरियाणा भागातील मळणीयंत्र चालक दाखल झाले आहेत. परंतु काळ्या कसदार जमिनीत काही ठिकाणी फारसा वाफसा नसल्याने ते मळणीला नकार देत आहेत. ऊन नसल्याने सोयाबीन कापणी करून तो वाळण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. कारण आर्द्रतायुक्त दाण्यांना दरही कमी मिळतात. दाणे काळवंडण्याची भीती असते. मळणीचे दर यंदा स्थिर आहेत. २०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मळणीयंत्रचालक घेत आहेत. सोयाबीनचे दर बाजारात सध्या ३३०० पर्यंत आहेत. सुरवातीच्या दरांचा लाभ मिळावा, यासाठी लवकर मळणी व वाळवणूक करून त्याची बाजारात पाठवणूक करण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत.

वाफशाअभावी मळणीयंत्रचालक शेतात यंत्र नेण्यास असमर्थता दर्शवित असून शेतकऱ्यांना अडचण येत आहेत. रब्बीची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची सोयाबीन मळणी उरकून घेत आहेत.

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...