agriculture news in marathi, Soyabean, horse pea producers get relief | Agrowon

सोयाबीन, हरभरा उत्पादकांना दिलासा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

ह रभरा, मसूरसहीत सर्वच कडधान्यांवरील निर्यातबंदी उठविणे आणि खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ हे केंद्र सरकारचे निर्णय स्वागतार्ह आहेत. बाजारावर त्याचा लगेचच मोठा परिणाम दिसणार नसला तरी दीर्घ कालावधीच्या दृष्टीने निश्चितच हे निर्णय फायदेशीर ठरतील, असे मत लातूर येथील व्यापारी व निर्यातदार नितीन कलंत्री यांनी व्यक्त केले.

ह रभरा, मसूरसहीत सर्वच कडधान्यांवरील निर्यातबंदी उठविणे आणि खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ हे केंद्र सरकारचे निर्णय स्वागतार्ह आहेत. बाजारावर त्याचा लगेचच मोठा परिणाम दिसणार नसला तरी दीर्घ कालावधीच्या दृष्टीने निश्चितच हे निर्णय फायदेशीर ठरतील, असे मत लातूर येथील व्यापारी व निर्यातदार नितीन कलंत्री यांनी व्यक्त केले.

यंदा देशात हरभऱ्याचा पेरा ३८ ते ४० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. तसेच हवामानाची स्थिती पोषक असल्यामुळे उत्पादकता (प्रति हेक्टरी उत्पादन) वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यंदा हरभऱ्याचे बंपर पीक येईल, असे चित्र आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढून बाजारभाव कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर बाजार सावरण्यासाठी निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयाचा फायदा होईल, असे कलंत्री म्हणाले. सध्या निर्यातीसाठी फारशी मागणी आणि भावात पॅरिटी नसल्यामुळे लगेचच या निर्णयाचा मोठा परिणाम दिसणार नाही. परंतु फेब्रुवारी-मार्चमध्ये या निर्णयाचे फायदे दिसतील, असे त्यांनी सांगितले.

हरभरा, मसूर यांच्या निर्यातीला परवानगी मिळाली असली तरी त्यांच्या आयातीवर शुल्क लावण्याविषयी मात्र अजून निर्णय झालेला नाही, याकडे कलंत्री यांनी लक्ष वेधले. आयात शुल्काचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती आहे. यासंबंधीचा निर्णय लवकर होणे गरजेचे आहे. अन्यथा बाहेर देशातील माल स्वस्तात भारतात डम्प होण्याची भीती आहे. हरभऱ्यातील संभाव्य भाव घसरणीचे संकट लक्षात घेऊन सरकारी खरेदीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर राबविणे गरजेचे आहे, असेही कलंत्री म्हणाले. 

सोयाबीनला आधार
खाद्यतेलावरील आयात शुल्कात दुप्पटीने वाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे. परंतु हा निर्णय घ्यायला सरकारने काहीसा उशीर केला आहे. कारण गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत अनेक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात आपला माल विकणे भाग पडले, असे कलंत्री यांनी सांगितले. मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना लागू केल्याने राज्य सरकारला हमी भाव आणि बाजारभाव यातील फरक शेतकऱ्यांना द्यावा लागला. आयात शुल्क वाढीचा निर्णय वेळीच घेतला असता तर यातील नुकसान मोठ्या प्रमाणावर कमी झाले असते, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.  
आयात शुल्क वाढीचा निर्णय आणि अमावस्येची सुटी यामुळे लातूर या महत्त्वाच्या बाजारपेठेत सोयाबीनचे दर १०० रुपयांनी वाढून २६५० ते २७०० रुपये क्विंटलवर पोचले आहेत.

केंद्र सरकारने कडधान्य व खाद्यतेलाच्या आयात-निर्यातसंबंधीचे निर्णय वेळेवर घेतले व त्यात किमीन तीन ते पाच वर्षांसाठी सातत्य ठेवले तर शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल आणि लागवड व उत्पादनात सातत्य राहील, असे मत कलंत्री यांनी व्यक्त केले. 

इतर अॅग्रोमनी
मका, हरभरा वगळता सर्व पिकांच्या भावात...या सप्ताहात हळद वगळता सर्वांचे भाव घसरले किंवा...
साखर खरेदीचा प्रस्ताव मंजुरीच्या...कोल्हापूर : घसरत्या साखर किमती रोखण्यासाठी राज्य...
आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात तेजीची...गेल्या आठवडाभरात देशात आणि परदेशात इतकी उलथापालथ...
कांदा बाजार संतुलित राहणारचालू आठवड्यात तुरळक प्रमाणात उन्हाळ कांद्याची...
द्राक्ष बाजाराला `मध्यम गती'चा दिलासाफेब्रुवारी महिना संपलाय आणि मार्च महिना सुरू...
महाराष्ट्रातील वाढीव साखर उत्पादनामुळे...यंदाच्या हंगामात (२०१७-१८) देशातील साखर उत्पादन...
डोळस पीक पद्धतीने उघडले आर्थिक उन्नतीचे...मेहकर तालुक्यातील परतापूर (जि. बुलडाणा) येथील...
‘जैन’कडून बेल्जियमच्या इनोव्हा फूड्स...जळगाव : जैन इरिगेशनची उपकंपनी जैन फार्म फ्रेश...
कापूस, सोयाबीनच्या फ्युचर्स भावात वाढया सप्ताहात साखर, गहू व हरभरा यांचे भाव वाढले....
महाराष्ट्रात ८ दशलक्ष टन साखर...नवी दिल्ली : महाराष्ट्रात २०१७-१८ (ऑक्टोबर-...
साखर विक्रीवर फेब्रुवारी, मार्चसाठी '...पुणे : देशातील साखरेचे दर घसरल्यामुळे साखर...
स्पॉट किमतींच्या तुलनेत कापसाच्या भावात...एक फेब्रुवारीपासून एनसीडीईएक्समध्ये जून २०१८...
सोयाबीनमधील तेजीला लगामपुणे : सोयापेंड निर्यातीला मर्यादा आल्यामुळे...
शेतीमाल विक्रीसाठी पॅकिंग, ब्रॅंडिंग...बाजारसमितीमध्ये येणाऱ्या शेतीमालावरून नजर हटवून...
सोयाबीन, कापसाच्या किंमतीत वाढीचा कलया सप्ताहातसुद्धा सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात...
कोल्हापुरात गूळ हंगाम मध्यावर १५ लाख...कोल्हापूर : यंदाच्या हंगामात जानेवारीच्या...
भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणारनवी दिल्ली : भारताने मागील दोन वर्षांपासून आर्थिक...
साखर मार्चपर्यंत दबावात राहणारनवी दिल्ली ः देशातील बाजारपेठेत सध्या साखरेचे दर...
कापूस, सोयाबीन, हळद, गवार बीच्या...या सप्ताहात सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात चढले....
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...