Agriculture News in Marathi, soyabean not arrived at procurement centres, Satara district | Agrowon

जाचक अटींमुळे सोयाबीन घरात ठेवण्याची वेळ
विकास जाधव
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017
सातारा ः केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची अर्थिक हानी सुरूच आहे. शासनाने शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभाव मिळावा, यासाठी जिल्ह्यात दोन खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांवर आजतागायत एकही क्विंटल सोयाबीनची आवक झालेली नाही.
 
सोयाबीन खरेदीसाठी शासनाकडून घालण्यात आलेल्या जाचक अटींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, सोयबीन घरात ठेवावे लागत आहे. यामुळे सोयाबीन खरेदी केंद्रे असून अडचण नसून खोळंबा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  
 
सातारा ः केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची अर्थिक हानी सुरूच आहे. शासनाने शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभाव मिळावा, यासाठी जिल्ह्यात दोन खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांवर आजतागायत एकही क्विंटल सोयाबीनची आवक झालेली नाही.
 
सोयाबीन खरेदीसाठी शासनाकडून घालण्यात आलेल्या जाचक अटींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, सोयबीन घरात ठेवावे लागत आहे. यामुळे सोयाबीन खरेदी केंद्रे असून अडचण नसून खोळंबा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  
 
राज्यासह सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात लाखो हेक्‍टर सोयाबीनची लागवड झाली आहे. दिवाळीसारख्या प्रमुख सणास पैसे उपलब्ध करून देणाऱ्या खरिपातील प्रमुख पिकांपैकी एक पीक म्हणून सोयाबीन पिकाकडे शेतकरी बघत आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांपासून सोयाबीनला मिळणारे दर, व्यापाऱ्याकडून होत असलेली लूट आणि त्या विरोधात प्रशासनाकडून न झालेली कारवाई, त्यात निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकऱ्यांत या पिकांबाबत नाराजी वाढू लागली आहे.  
 
खरीप हंगामाच्या सुरवातीपासून सोयाबीनची खरेदी होणार नसल्याच्या अफवा येऊ लागल्याने शेतकऱ्यांत हे पीक घेण्याबाबत द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. याबाबत प्रशासानकडून खुलासा केल्यावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली होती. सध्याची परिस्थिती बघता शेतकऱ्यांमध्ये पसरलेली अफवा खरी होताना दिसू लागली आहे.
 
सोयाबीनला किमान आधारभूत दर हा ३०५० प्रतिक्विंटल प्रमाणे जाहीर करण्यात आला आहे. मात्र या दरापेक्षा कमी म्हणजेच २५०० ते २७०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे सोयाबीनची व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आली. यावरून शेतकरी संघटनेकडून आंदोलने झाल्यावर किमान आधारभूत किमतीपेक्षा सोयाबीन खरेदी केल्यास खरेदीचे परवाने रद्द करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर व्यापाऱ्यांकडून सोयाबीन खरेदी बंद करण्यात आली आहे. परिणामी शेतकऱ्यांना सोयाबीन ठेवण्याशिवाय पर्याय उरला नाही. 
 
शेतकऱ्यांना सोयाबीनला हमीभाव मिळावा यासाठी जिल्हा मार्केटिंग विभागाकडून सातारा व कराड येथे १६ ऑक्‍टोबरला दोन खेरदी केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांवर सोयाबीन आणताना सोयाबीन नोंद असलेला सातबारा, एकरी आठ क्विंटल सोयाबीन, आधार कार्ड, बॅंक पासबुक झेराक्‍स बंधनकारक करण्यात आले आहे. या केंद्राचा शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी जरी अटी घालण्यात आल्या असल्या तरी त्या आता जाचक ठरत आहेत. 
 
साधारणपणे खरिपातील सातबाऱ्यावरील पीकपाण्याची नोंद जानेवारी महिन्यात होत असते. यामुळे सातबाऱ्यावरील पीक पाण्याची अट शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीची ठरली आहे. सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीन आणताना त्यामध्ये माती, दगड, काडीकचरा स्वच्छ करून आणण्याची अट घालण्यात आली आहे.
 
सोयाबीन माती, दगड, काडीकचरा वेगळा करण्यासाठी खूप परिश्रम करावे लागत आहे. एवढे करून अपेक्षित स्वच्छता होत नसल्याने कपात होत असते. यासाठी तुरीला खरेदी केंद्रावर ज्या प्रकारे चाळे लावले जातात त्याच पद्धतीने सोयाबीनला चाळे लावावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 
 
शासनाचे दुटप्पी धोरण 
सोयाबीन खरेदी करत असताना एकरी आठ क्विंटलची खरेदीची अट घालण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत आहे आणि दुसरीकडे खेरदी कराव्या लागणाऱ्या सोयाबीनचे एकरी आठ क्विंटल उत्पादनाचा नियम लावत आहे. यावरून प्रकारावरून शेतकऱ्यांबाबत शासन दुटप्पी धोरण राबवत असल्याचे दिसून येत आहे.
 
शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून काढणी सुरू असलेल्या सोयाबीनला एकरी आठ क्विंटलपासून १५ क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळत आहे. केंद्रावर जर आठच क्विंटल सोयाबीन खरेदी करणार असले तर राहिलेल्या सोयाबीनचे करायचे काय, असा प्रश्‍न निर्माण केला जात आहे. 
 
सरकार शेतकऱ्यांबाबत दुटप्पी धोरण राबवत आहे. एकीकडे उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत, दुसरीकडे एकरी आठ क्विंटलची अट घालत आहेत. एकूणच शासन शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहेत. सोयाबीन खरेदीतील जाचक अटी रद्द कराव्यात, तसेच गावागावांत खरेदी केंद्रे सुरू करून सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी.
- पंजाबराव पाटील, 
केंद्रीय अध्यक्ष, बळिराजा शेतकरी संघटना

इतर ताज्या घडामोडी
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...
‘त्या’ कंपनीला काळ्या यादीत टाका :...लातूर ः येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर...
रेशन धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिन...वडूज, जि. सातारा : रेशन घेण्यास आलेल्या...
भारनियमनामुळे शेती ऑफलाइननांदुरा, जि. बुलढाणा : शासनाने सर्व योजनांचे...
दूध संघांना अनुदान द्या : अरुण नरकेपुणे ः राज्य सरकारने दुधाला २७ रुपये प्रतिलिटरचा...
पुण्यात पालेभाज्यांची आवक टिकून; दर...पुणे : मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजारात सलग...
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत...नागपूर : बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91 व्या...
नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारलेमेहुणबारे/ पिलखोड/ चाळीसगाव : गिरणा परिसरात...
सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक...
उद्धव ठाकरे गप्प बसा; अन्यथा रहस्ये...सांगली ः शिवसेना सोडण्याचे कारण उद्धव ठाकरे आहेत...
गिरणा धरणातून पहिले आवर्तन सोडलेचाळीसगाव :  गिरणा धरणातून सिंचनासाठीचे पहिले...
पीक नुकसानीचे दहा दिवसांत पंचनामे...औरंगाबाद : कापूस व धान पिकाच्या झालेल्या...
दक्षिण गुजरात, सौराष्ट्राचा कौल मतपेटीत...अहमदाबाद, गुजरात : येथील विधानसभेच्या पहिल्या...
रोहित्र दुरुस्तीचा विलंब भोवला; भरपाई...अकोला :  वीज रोहित्राची वेळेवर दुरुस्ती न...
व्यावसायिक कल्चरमुळे वाढते...खाद्यपदार्थ किण्वनातील जिवाणूंचा झाला अभ्यास...
बोगस बियाणे निर्मितीच्या संशयावरून...बुलडाणा : नांदुरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर...
कृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्याडिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड...
औरंगाबादेत कांदा १००० ते ३५०० रुपयेऔरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
मध्यम आकाराचे मांसभक्षक येतील पर्यावरण...मध्यम आकाराच्या मांसभक्षक प्राण्यांवर...