सोयाबीनची होणार हमीभावाने खरेदी

एेन सणासुदीच्या तोंडावर बाजारातले दर घसरू नये म्हणून सोयाबीनची १ लाख टन खरेदी केंद्र सरकार करणार आहे. - पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषी मुल्य आयोग, महाराष्ट्र.
सोयाबीनची होणार हमीभावाने खरेदी
सोयाबीनची होणार हमीभावाने खरेदी

नवी दिल्ली : महाराष्ट्रातून १ लाख टन सोयाबीनची खरेदी करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली आहे. विक्री हंगामाच्या प्रारंभीच केंद्र सरकारकडून हमीभावाने खरेदीची घोषणा करण्यात आल्याने राज्यातील सोयाबीन दर नियंत्रणात राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात यंदा सोयाबीनचा ३८ लाख १७ हजार ७५१ हेक्टर क्षेत्रावर पेरा आहे. सरासरीच्या ३२ लाख ३ हजार ३८० हेक्टर क्षेत्रापेक्षा तो सुमारे ६ लाख हेक्टरने जास्त आहे. यामुळे बाजार समित्यांत आवक वाढून दर किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) कमी होऊ नयेत, यासाठी एक लाख टनांची केंद्राद्वारे खरेदी केली जाणार आहे. चालू खरीप हंगामासाठी सोयाबीनला क्विंटलमागे २८५० रुपये हमीभाव, तर २०० रुपये बोनस असा एकूण ३०५० रुपये अंतिम हमीभाव होतो. सध्या राज्यात सोयाबीनला २५०० ते २९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहेत.

महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानच्या भुईमूग, उडीद, सोयाबीन आणि मुगाच्या खरेदीच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आल्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी ट्विटरद्वारे स्पष्ट केले आहे. ही खरेदी खरीप हंगाम २०१७ साठी असणार आहे.

केंद्र सरकारने तेलबियांचे दर हमीभावा पेक्षा कमी होऊ नये म्हणून मध्यंतरी आयात शुल्क वाढविले. एेन सणासुदीच्या तोंडावर बाजारातले दर घसरू नये म्हणून सोयाबीनची १ लाख टन खरेदी केंद्र सरकार करणार आहे. सरकारचे हे धोरण शेतकरी हिताचेच आहे, योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाबद्दल स्वागत आहे, असे महाराष्ट्र कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटले आहे.  

बुधवार/गुरुवारचे सोयाबीन दर (रुपये/क्विंटल)
बाजार समिती आवक किमान कमाल सरासरी दर
अकोला ११९२ २६६० २८९५ २७८०
अमरावती १५०२ २४०० २९४० २९४०
लासलगाव २७३ २७०० २९११ २९११
नागपूर ७९ २५५० २८०२ २७३९
वाशीम १५०० २५०० २९३० २८००

(स्रोत ः एमएसएएमबी)  

अशी होणार खरेदी
राज्य शेतमाल खरेदी
महाराष्ट्र सोयाबीन १ लाख टन
राजस्थान भुईमूग दीड लाख टन
  उडीद ३० हजार टन
  सोयाबीन दीड लाख टन
  मूग दीड लाख टन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com