agriculture news in marathi, soyabean purchased below MSP in Pusad, Yavatmal | Agrowon

गेटवरच सोयाबीनची कमी दराने खरेदी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

यवतमाळ : पुसद बाजार समितीच्या प्रवेशद्वारातच हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी होत असल्याचे पाहून संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीत धडक देत याप्रकरणी जाब विचारला. शेतकऱ्यांच्या सोयीकरिता ही व्यवस्था असल्याचे सांगत बाजार समिती प्रशासनाने सांगितल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्‍त होत आहे. 

यवतमाळ : पुसद बाजार समितीच्या प्रवेशद्वारातच हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी होत असल्याचे पाहून संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीत धडक देत याप्रकरणी जाब विचारला. शेतकऱ्यांच्या सोयीकरिता ही व्यवस्था असल्याचे सांगत बाजार समिती प्रशासनाने सांगितल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्‍त होत आहे. 

पुसद बाजार समितीसमोरच काही व्यापाऱ्यांनी शेड उभारत खुलेआम खेडा खरेदी चालविली आहे. २२०० ते २४०० रुपये इतक्‍या कमी दराने व्यापारी सोयाबीन खरेदी करत आहेत. (कै.) वसंतराव नाईक यांचा पुसद हा गृहतालुका, शेतकऱ्यांसाठी अहोरात्र काम केलेल्या या नेत्याच्या तालुक्‍यातच अशाप्रकारे शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे पाहून शेतकरी अस्वस्थ झाले.

वाकद (ता. महागाव) येथील मनीष जाधव यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बाजार समितीत याप्रकरणी धडक दिली. बाजार समिती प्रशासनाशी या संदर्भाने चर्चा करण्यात आली; परंतु बाजार समिती प्रशासनाने याप्रकरणी कारवाईचे आश्‍वासन देण्याऐवजी बाजार समितीबाहेरील व्यवस्था शेतकऱ्यांच्या सोयीकरिता असल्याचे सांगत शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न केला. या कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्‍त होत होता. 

हमीभाव केंद्र सुुरू करा
जिल्ह्यात २९ शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र अद्यापही त्यातील एकही केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून होणारी लूट सुरूच आहे. या संदर्भाने लवकरच निर्णय न झाल्यास जिल्हाभरात आंदोलन करू, असा इशारा मनीष जाधव यांनी दिला आहे.

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...