त्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.
ताज्या घडामोडी
अकोला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. 9) सोयाबीनची 2845 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला 2600 ते 3100 रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
अकोला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. 9) सोयाबीनची 2845 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला 2600 ते 3100 रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
गेले अनेक महिने दर नसल्याने चिंतातूर असलेल्या सोयाबीन उत्पादकांना आता थोडासा दिलासा मिळू लागला आहे. वऱ्हाडातील सर्वच बाजारांमध्ये सोयाबीन दराने तीन हजारांवर उडी घेतली आहे. यावर्षी सोयाबीनचा हंगाम सुरू झाल्यानंतर बाजारातील दर अवघे 1800 पासून सुरू झाले होते. गेले अनेक महिने सोयाबीनचा दर 2200 ते 2600 रुपये प्रति क्विंटल होता. नववर्षाची सुरवात सोयाबीन दरांसाठी पूरक ठरली आहे. सोयाबीनचा दर 3100 पर्यंत पोचला आहे.
वाशीममध्ये दरात सुधारणा
येथील बाजार समितीत सोयाबीनची 2500 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यास किमान 2700 व कमाल 3200 रुपये प्रतिक्विंटल दर होता. या बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सुधारणा होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
अकोला "कृउबा"तील दर (रुपये प्रतिक्विंटल)
शेतीमाल | आवक | दर |
तूर | 1100 | 3625 ते 4475 |
हरभरा | 447 | 3100 ते 4265 |
मूग | ... | 4300 ते 5100 |
उडीद | ... | 3400ते 4100 |
- 1 of 347
- ››