सोयाबीनच्या दरात १५० ते २००ची सुधारणा

सोयाबीनच्या दरात  १५० ते २००ची सुधारणा
सोयाबीनच्या दरात १५० ते २००ची सुधारणा

खाद्यतेल आयात निर्बंधांचे पडसाद   कमाल दर २८०० ते ३००० पर्यंत अकोला : केंद्र सरकारने खाद्यतेल आयातीवर निर्बंध लावल्यानंतर देशांतर्गत बाजारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सोयाबीनच्या दरात दीडशे ते दोनशे रुपयांनी सुधारणा होऊन वेगवेगळ्या बाजारात २८०० ते ३००० रुपयांपर्यंत विक्री केली जात अाहे. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून सोयाबीनच्या दरात मंदी होती. हा हंगाम सुरू झाला तेव्हा तर अगदी १८०० रुपयांपासून २२०० ते २३०० दरम्यान सोयाबीनची मागणी केली जात होती. अाता किमान दर २२०० ते २४५० दरम्यान मिळत असल्याने सोयाबीन उत्पादकांना किंचितसा दिलासा मिळण्याची शक्यता अाहे. केंद्र सरकारने देशात सर्व प्रकारच्या खाद्यतेल अायातीवर शुल्क वाढ केल्याने ही दरवाढ गृहीत धरली जात अाहे.      राज्यात या खरीप हंगामात सुमारे ३५ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरा झाला होता. त्यात अर्धेअधिक क्षेत्र हे विदर्भाचे अाहे. या हंगामात कमी व खंड स्वरूपातील पावसाचा फटका सर्वाधिक सोयाबीनला बसला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट अालेली अाहे. 

एकरी अाठ ते दहा क्विंटलपर्यंत येणारे उत्पादन सरासरी ३ ते ४ क्विंटलच्या अात राहले. सोयाबीन काढणीला अाले त्या वेळी परतीच्या पावसामुळे उत्पादनाचा दर्जा खालावला. या सर्वच बाबी सोयाबीन पिकाला व उत्पादक शेतकऱ्यांसाठी मारक ठरल्या होत्या. काळसर व दर्जा खालावलेली सोयाबीन जेव्हा बाजारात विक्रीला अाली त्या वेळी व्यापाऱ्यांनी अवघी १८०० रुपयांपासून मागणी सुरू केली. त्या वेळी अधिकाधिक दर २२०० पर्यंत मिळत होता. परंतु, अाता या अाठवडाभरात सोयाबीनच्या दरात सुधारणा होत गेली.  

शुक्रवारी (ता.२४) अकोला बाजारात सोयाबीन २४५० ते २८२५ रुपये विकले. २५२३ क्विंटलची अावक झाली होती. वाशीम बाजार समितीत सोयाबीनला २४०० ते २९०० रुपये भाव मिळाला. सुमारे साडेसहा हजार क्विंटल सोयाबीन विक्रीला अाली होती. तर बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव बाजारात १२ हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची अावक झाली होती. या सोयाबीनला  २२०० पासून ३००० पर्यंत दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com