Agriculture News in Marathi, soyabean rate incresed, Jalgaon district | Agrowon

जळगावात सोयाबीनच्या दरात ४०० रुपयांनी वाढ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मागील पंधरवड्यात सुधारणा झाली आहे. दरात क्विंटलमागे ३५० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यातच दरवाढ झाल्याने लिलावांनाही प्रतिसाद मिळू लागला आहे. ही दरवाढ टिकून राहील, असा अंदाज अडतदारांनी व्यक्त केला आहे.

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मागील पंधरवड्यात सुधारणा झाली आहे. दरात क्विंटलमागे ३५० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यातच दरवाढ झाल्याने लिलावांनाही प्रतिसाद मिळू लागला आहे. ही दरवाढ टिकून राहील, असा अंदाज अडतदारांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात जळगाव बाजार समिती सर्वांत मोठी आहे. परंतु मध्यंतरी सोयाबीन खरेदीसंबंधी प्रतिसाद नव्हता. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन आवक झाल्यानंतर पडून राहत होती. नाईलाजाने हे सोयाबीन अडतदारांकडे ठेवावे लागायचे. त्यात अडतदार चांगले ग्राहक मिळाल्यास त्याची विक्री करून नंतर शेतकऱ्याला रोखीने पैसे देत होते. परंतु मागील पंधरवड्यात दरांमध्ये सुधारणा व्हायला लागली.

सध्या प्रतिदिन ५०० ते ७०० क्विंटल एवढी आवक होत आहे. लिलाव सकाळीच होत असून, दर्जानुसार दर मिळत आहेत. बाजार समितीमध्येच मार्केटिंग फेडरेशनचे शासकीय सोयाबीन व कडधान्य खरेदी केंद्र सुरू असल्याने दर्जेदार मालाची या केंद्रात शेतकरी विक्री करतात. तर या केंद्रात नाकारलेल्या सोयाबीनला बाजार समितीमध्ये किमान २३०० रुपयांपर्यंत दर मिळतो.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला सोयाबीनचे दर १९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. त्यात हळूहळू सुधारणा होऊ लागली. सद्यःस्थितीत किमान दर २२५० ते २३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असल्याची माहिती मिळाली. सोयाबीनची आवक मध्य प्रदेशातूनही होऊ लागली आहे.

थेट व्यापाऱ्यांकडून तेथून सोयाबीन येतो. शहरातील तेल गिरण्यांमध्ये त्याची बाजार समितीमधील मध्यस्थांकडून पाठवणूक केली जाते, अशी माहिती मिळाली. तसेच जिल्ह्यातील जळगाव, यावल, पाचोरा तालुक्‍यांतूनही सोयाबीन येत आहे.

सोयाबीनची आवक अलीकडे थोडी कमी झालेली आहे. त्याच्या दरात या महिन्यात वाढ होऊ लागली आहे. लिलाव प्रक्रियाही सकाळी होत आहे. क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपये दरवाढ झाली आहे.
- लक्ष्मण पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...